Sreeleela : “मी रडायचे, खूप त्रास व्हायचा… “; ट्रोलिंगवर श्रीलीलाने सांगितली ‘ती’ गोष्ट, म्हणाली “इंडस्ट्री सोडून जाण्याचाही विचार केला होता पण…”
Sreeleela : अभिनेत्री श्रीलीला हिने ट्रोलिंगबद्दल आपले मत व्यक्त करताना महत्वाची गोष्ट सांगितली आहे.

Sreeleela : तेलुगू अभिनेत्री श्रीलीला ‘उस्ताद भगत सिंग’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती अभिनेता पवन कल्याणसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. त्यामुळे चाहते या चित्रपटाची वाट पाहत आहेत. मनोरंजन विश्वातील कलाकारांना अनेकदा एखाद्या गोष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जाते. यावर अनेक कलाकारांनी आपले मते व्यक्त केली आहेत.
आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतील श्रीलीलाने ट्रोलिंगबद्दल आणि या गोष्टीचा तिच्यावर कसा परिणाम होतो याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. तिने चित्रपटसृष्टी सोडण्याचा विचार का केला होता, हेदेखील तिने यावेळी बोलताना स्पष्ट केले.
सुमा कनकवाला यांच्या ‘द रील फ्लेवर’ या चॅट शोमध्ये श्रीलीला ट्रोलिंगमुळे त्रास होतो का, असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना अभिनेत्री म्हणाली, “जेव्हा मी इंडस्ट्रीत नवीन होते, तेव्हा खूप त्रास व्हायचा.”
पुढे ती म्हणाली, मला खूप वाईट वाटायचे, मी रडायचे. मी माझ्या आईला हेही म्हणाले होते, “मला नाही वाटत की मी हे करू शकेन. मी पुन्हा शाळेत किंवा कॉलेजला जाऊ का? मी खूप संवेदनशील होते, पण आता मला काही फरक पडत नाही. खरंतर तिच्या मनात इंडस्ट्री सोडण्याचा विचार घोळत होता, पण काळ जसा पुढे सरकत गेला तसा तिने याकडे दुर्लक्ष केले असे तिने यावेळी बोलताना स्पष्ट केले.
आजकालच्या लोकांमध्ये जास्त बुद्धिमत्ता आहे.
श्रीलीला पुढे म्हणाली, “मला वाटते की आजकालच्या लोकांमध्ये स्वतःची बुद्धिमत्ता असते. म्हणूनच, नकारात्मकता दिसली तरी ते कमी विचार करतात. आजकालच्या लोकांमध्ये पूर्वीपेक्षा जास्त बुद्धिमत्ता आहे. म्हणूनच ते जास्त विचार करतात.”
श्रीलीलाच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ती ‘उस्ताद भगत सिंग’नंतर एका मोठ्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज आहे. संगीतमय प्रेमकथेत ती अभिनेता कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे.
सुरुवातीला या चित्रपटाचे नाव ‘आशिकी 3’ असे सांगितले जात होते. आता या चित्रपटाचे नवीन नाव ‘तू मेरी जिंदगी है’ असे ठेवण्यात आले आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.





