Sports In Pune : लायन्स व्हेट्रेन टी-20 क्रिकेट स्पर्धेचा थरार ‘सोमवार’पासून रंगणार…

पुणे – लायन्स क्लब ऑफ पुणे रहाटणी च्या वतीने स्वर्गीय ला.सागर डोमसे यांच्या स्मरणार्थ लायन्स व्हेट्रेन टी-२० क्रिकेट स्पर्धेत 8 निमंत्रित संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेचे हे चौथे वर्ष असुन अतिशय उत्साहात ही स्पर्धा होत असते.सदर स्पर्धा मोशी येथील हजारे मैदान व थेरगाव येथील व्हेरॉक मैदानावर २२ जानेवारीपासुन सूरू होणार आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहिती देताना स्पर्धा संचालक ला.फैयाज लांडगे यांनी सांगितले की, स्वर्गीय लायन सागर डोमसे यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असुन या स्पर्धेत क्लासिक पँथर, लवाज रॉयल, गार्गी एज्युकॉन अँड स्मार्ट टेक, पासलकर रॉयल्स, मेव्हरिक्स लिजंट क्लब, बसारी ब्लास्टर, स्वयुष स्टायकर्स, दिक्षित रॉयल, या संघानी सहभाग घेतला आहे.
World Test Championship (2023-2025) : टीम इंडियासाठी प्रत्येक कसोटी मालिका महत्वाची…
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी मेव्हरिक्स लिजंट क्लब व दीक्षित रॉयल आणि लवाज रॉयल व बसारी ब्लास्टर, हे संघ झुंजणार आहेत. स्पर्धेच्या साखळी फेरीचे सामने हजारे मैदान व व्हेरॉक मैदानावर, तर बाद फेरीचे सामने हजारे मैदानांवर होणार आहेत. स्पर्धेत 40 वर्षांवरील खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला करंडक अशी आकर्षक पारितोषिके देण्यात येणार असल्याचे ला.फैयाज लांडगे यांनी यांनी सांगितले.





