Journalist Kissed Live : मैदानात फुटबॉलचा थरार, पण बाहेर महिला फॅन्सचा धुमाकूळ! कॅमेऱ्यासमोरच पत्रकाराला केलं थेट ‘किस’, पाहा VIDEO
Journalist Kissed Live : थेट मैदानातून लाईव्ह रिपोर्टिंग करणाऱ्या एका दक्षिण कोरियन टीव्ही पत्रकाराला एका महिला फॅनने कॅमेऱ्यासमोर अचानक गालारवर किस केला. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

South Korean Journalist Kissed By Female Fan Mexico : उत्तर अमेरिका खंडात सुरू असलेल्या ‘फिफा विश्वचषक २०२६‘ च्या मैदानावर जिथे फुटबॉलचा थरार शिगेला पोहोचला आहे, तिथेच मैदानाच्या बाहेरूनही अनेक रंजक आणि थक्क करणाऱ्या बातम्या समोर येत आहेत. सध्या सोशल मीडियावर मेक्सिकोमधील एक व्हिडीओ प्रचंड धुमाकूळ घालत आहे. यामध्ये थेट मैदानातून लाईव्ह रिपोर्टिंग करणाऱ्या एका दक्षिण कोरियन टीव्ही पत्रकाराला एका महिला फॅनने कॅमेऱ्यासमोर अचानक गालारवर किस केला. हा संपूर्ण प्रकार थेट कॅमेऱ्यात कैद झाला असून इंटरनेटवर या व्हिडिओने खळबळ उडवून दिली आहे.
लाईव्ह कॅमेऱ्यासमोर अचानक आली अन्… (Journalist Kissed Live)
हा संपूर्ण प्रकार मेक्सिकोमधील एका खचाखच भरलेल्या ‘फॅन झोन’मध्ये घडला. दक्षिण कोरियाचा एक टीव्ही पत्रकार तेथील फुटबॉल फॅन्सचा उत्साह आणि विश्वचषकाचे वातावरण थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत होता. त्याचे पूर्ण लक्ष कॅमेऱ्यावर आणि त्याच्या रिपोर्टिंगवर होते. तो बोलत असतानाच, पाठीमागून एक तरुण महिला फॅन धावत आली. पत्रकार काही समजण्याच्या आतच तिने त्याच्या गालावर एक ‘सरप्राइज किस’ केले आणि ती हसत-हसत गर्दीत गायब झाली.
धक्क्यातून सावरत पत्रकाराने जिंकली मने! (Journalist Kissed Live)
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तो दक्षिण कोरियन पत्रकार काही सेकंदांसाठी पूर्णपणे थक्क झाला. धक्का बसल्यामुळे त्याने बोलणे थांबवले, मात्र अत्यंत व्यावसायिकता दाखवत त्याने स्वतःला लगेच सावरले.
Dünya Kupası için Meksika’da canlı yayına bağlanan Güney Kore muhabiri, Meksikalı bir kız tarafından öpülünce kısa sürede viral oldu. pic.twitter.com/HWhVlK6yp2
— Serkan Tanyildizi (@srkntnyldz) June 11, 2026
अशा असहज परिस्थितीतही रागावण्याऐवजी त्याच्या चेहऱ्यावर एक मोठी गोड स्माईल आली. त्याने आपले मानसिक संतुलन ढळू न देता अत्यंत हसतमुखाने आपली लाईव्ह ब्रॉडकास्टिंग पुढे सुरू ठेवली. Journalist Kissed Live
सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज – (Journalist Kissed Live)
हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर आगीसारखा पसरला असून आतापर्यंत लाखो लोकांनी तो पाहिला आहे. नेटीझन्स या पत्रकाराच्या संयमाचे आणि व्यावसायिक वृत्तीचे कौतुक करत आहेत. फिफा वर्ल्डकपमधील हा मजेशीर आणि सरप्राईझ व्हिडीओ सध्या फुटबॉल चाहत्यांमध्ये चर्चेचा मुख्य विषय बनला आहे.





