Shoaib Akhtar Criticizes : “भारताने क्रिकेटचं वाटोळं केलं!” टीम इंडियाच्या विजयानंतर अख्तरचा जळफळाट; आमिरनेही ओकली गरळ
Shoaib Akhtar Criticizes : ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर कौतुकांचा वर्षाव होत असताना, दुसरीकडे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारतावर टीका केली आहे.

Shoaib Akhtar criticizes Indian cricket after win T20 world cup : नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंचा पराभव केला. या विजयासह भारताने विक्रमी तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर नाव कोरले. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर कौतुकांचा वर्षाव होत असताना, दुसरीकडे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारतावर टीका केली आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने विश्वचषक राखून इतिहास घडवला आहे. मात्र, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने भारताच्या विजयावर टीका करताना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन तुलना केली आहे. ‘गेम ऑन है’ या टीव्ही शोमध्ये बोलताना त्याने भारताची तुलना गल्लीतील एका श्रीमंत मुलाशी केली आहे.
काय म्हणाला शोएब अख्तर?
शोएब अख्तर म्हणाला की, “जणू एखाद्या परिसरात एक श्रीमंत मुलगा असतो आणि तो गरीब मुलांना बोलावून म्हणतो, ‘या, क्रिकेट खेळूया’. भारत सध्या अगदी तेच करत आहे. त्यांनी क्रिकेटचे वाटोळे करून टाकले आहे”. विशेष म्हणजे, अंतिम सामन्यापूर्वी अख्तरने भारताला प्रबळ दावेदार मानले होते, मात्र क्रिकेटच्या भल्यासाठी न्यूझीलंडने जिंकावे अशी इच्छा व्यक्त केली होती.
Look at the hypocrisy of Shoaib Akhtar, on one hand he is saying such things and on the other hand he is listening to the criticism of India. pic.twitter.com/jKKDGtWqtu
— Neeraj Ranjan (@NeerajRanjan84) March 9, 2026
मोहम्मद आमिरचाही खोडसाळपणा –
वादग्रस्त विधाने करण्यात पाकिस्तानचा मोहम्मद आमिर देखील मागे राहिला नाही. त्याने भारताच्या विजयाचे श्रेय न्यूझीलंडच्या गोलंदाजांना दिले. आमिरच्या मते, किवी गोलंदाजांना पुरेसा दबाव निर्माण करता आला नाही, त्यामुळे भारताला विजय मिळवणे सोपे गेले. धक्कादायक म्हणजे आमिरने सुपर-८ पासून भारताच्या पराभवाची भविष्यवाणी केली होती, जी भारतीय खेळाडूंनी सातत्याने खोटी ठरवली.
गौतम गंभीरचे मात्र केले कौतुक –
भारतीय क्रिकेटवर टीका करणाऱ्या शोएब अख्तरने गौतम गंभीरचे मात्र कौतुक केले. तो म्हणाला, कठीण काळातही खेळाडूंवर विश्वास ठेवण्याची गंभीरची पद्धत मोठ्या स्पर्धांमध्ये फरक निर्माण करणारी ठरते, असे मत त्याने व्यक्त केले.





