IND vs AUS : मिचेल स्टार्कच्या पहिल्या चेंडूने खळबळ, पण शोएब अख्तरचा विक्रम अबाधित! नेमकं काय घडलं? जाणून घ्या

Mitchell starc bowling speed : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात वारंवार पावसाचा व्यत्यय येत आहे. आतापर्यंत तीनदा हा सामना थांबवण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला असून 16.4 षटकांनंतर भारताने 4 बाद 52 धावा केल्या आहेत आणि पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने फेकलेल्या पहिल्या चेंडूने सर्वांचे लक्ष वेधले. नेमकं काय कारण आहे? जाणून घेऊया.
स्टार्कच्या पहिल्या चेंडूची चर्चा –
मिचेल स्टार्कने सामन्याच्या पहिल्या षटकात फेकलेल्या पहिल्या चेंडूवर भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने एक धाव घेतली. या चेंडूची गती 171.5 किमी प्रतितास असल्याचा दावा सोशल मीडियावर काही जणांनी केला. मात्र, ही माहिती तांत्रिक चुकांमुळे चुकीची ठरली आहे. क्रिकबझने पुष्टी केल्यानुसार, स्टार्कने हा चेंडू 140.8 किमी प्रतितास वेगाने फेकला होता.
Mitchell Starc with a casual 176.5 kph delivery to start the ODI series. This is why you retire from T20s 😁 pic.twitter.com/BMaNyeV4Nd
— Rohit Sankar (@imRohit_SN) October 19, 2025
शोएब अख्तरच्या नावावर सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम –
Mitchell Starc bowled at 176.5khp😱😰 pic.twitter.com/cDpLjRsZ1r
— cheeks (@footprint_r) October 19, 2025
वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा विक्रम पाकिस्तानच्या शोएब अख्तरच्या नावावर आहे. त्याने 2003 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 161.3 किमी प्रतितास वेगाने चेंडू फेकला होता. स्टार्कचा 140.8 किमी प्रतितास वेगाचा चेंडू हा अख्तरचा विक्रम मोडण्यापासून बराच मागे आहे.
हेही वाचा – IND vs AUS : विराट फक्त धावाच करण्यात नव्हे तर डकमध्ये सर्वात पुढे! आता ‘या’ लज्जास्पद यादीत झाला सामील
रोहित-विराटची निराशाजनक कामगिरी –
या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी निराशाजनक राहिली. बऱ्याच कालावधीनंतर पुनरागमन करणारे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विशेष कामगिरी करता आली नाही. रोहितने 14 चेंडूंमध्ये 8 धावा केल्या, तर विराट कोहली शून्य धावांवर मिचेल स्टार्कच्या चेंडूवर बाद झाला. कर्णधार शुबमन गिलने 18 चेंडूंमध्ये 10 धावा केल्या. अय्यरही 24 चेंडूत 11 धावा काढून बाद झाला. सध्या पावसामुळे सामना थांबलेला असून, 16.4 षटकांनंतर भारताने 4 बाद 52 धावा केल्या आहेत.
हेही वाचा – IND vs AUS : पहिल्याच सामन्यात विराट कोहलीसोबत हे काय घडलं? ऑस्ट्रेलियन भूमीवर पहिल्यांदाच झालं असं
पुढील अपडेट्सची प्रतीक्षा –
सध्या पावसामुळे सामना थांबला असून, चाहते आणि खेळाडू पुढील अपडेट्सची वाट पाहत आहेत. हा सामना कधी सुरू होईल आणि भारतीय संघ कशी कामगिरी करेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





