पुणे जिल्हा | मांडकीत सोपानकाका महाराज पालखीचे उत्साहात स्वागत

वाल्हे, {समीर भुजबळ} –
व्यास आणि वाल्मिकी कोण कूळ त्यांचे । तैसेचि आमुचे सोपान म्हणे ॥
श्री संत सोपानकाका महाराजांचा पालखी सोहळा वीर, लपतळवाडी या गावांचे स्वागत स्वीकारीत मांडकी (ता. पुरंदर) येथे दुसर्या दिवसांच्या मुक्कामासाठी गुरुवारी (दि.4) विसावला. यावेळी, टाळ-मृदंगाच्या तालावरती हातात भगवी पताका घेऊन ज्ञानोबा तुकाराम यांचा जयघोषात, अवघे मांडकी गाव दुमदुमले होते.
तर हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पालखी सोहळ्याचे गुरुवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान, ऊन- सावलीच्या खेळत आगमन झाले. ग्रामस्थांच्या वतीने रस्त्याच्या दुतर्फा रांगोळ्यांच्या व फुलांच्या पायघड्या अंथरल्या होत्या. पारंपरिक ढोल-लेझीमच्या तालावर मांडकी येथील ग्रामस्थ व न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझीमचा खेळ करीत पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल – रूक्मिणी ची वेशभूषा परिधान करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. सायंकाळी 7 नंतर ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणामध्ये पालखी विसावली. दरम्यान, चोपदारांनी सूचना केल्यानंतर हजारो वैष्णवांच्या उपस्थित सोपानदेवांची आरती झाली.
आरतीनंतर रात्री उशीरापर्यंत भाविकांनी दुतर्फा रांगा लावून सोपानकाकांच्या पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी पालखीच्या दर्शनासाठी लपतळवाडी, मांडकी, जेऊर, वाल्हे, पिसुर्टी, हरणी, पिंगोरी, दौंडज आदी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने भाविक आले होते.
सोमेश्वरचे साखर कारखान्याने संचालक विश्वास जगताप, माजी संचालक मानसिंग जगताप, मोहन जगताप, सरपंच प्रियांका शिंदे, उपसरपंच मोहन जगताप, माजी सरपंच सतीश जगताप, माजी पोलीस पाटील प्रवीण जगताप, वि
जय साळुंखे, विश्वास जगताप, बाळासो जगताप, गजानन शिंदे, विकास सोसायटी चेअरमन विकास जगताप, तेजपाल सणस आदींच्या हस्ते ही पुष्पहार अर्पण करून स्वागत करून विश्वस्त त्रिगुण गोसावी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी, चोपदार सिद्देश महाराज, चोपदार मनोहर महाराज रनवरे, ज्ञानेश्वर महाराज तांबे, न्यू इंग्लिश स्कूल मांडकी येथील मुख्याध्यापक अरविंद भोसले, मांडकी ग्रामपंचायतीचे आजी- माजी सरपंच, उपसरपंच, आजी-माजी सदस्य, विविध सहकारी संस्थेचे चेअरमन,
व्हाईस चेअरमन, संचालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.दरम्यान, लपतळवाडी येथे सरपंच मंगल शेटे, उपसरपंच रवींद्र मोरे यांच्या हस्ते पालखीचे स्वागत करण्यात आले. यावेळी,माजी सरपंच सुर्वणा कदम, कौशल्या पिलाणे, नितिन पिलाणे, नवनाथ पिलाणे, प्रा. कुंडलिक कदम आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.





