भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने रविवारी वर्ल्ड बॅडमिंटप चॅपियनशिपमध्ये सुर्वण पदक जिंकत आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. पीव्ही सिंधुच्या या यशाचे बॉलिवूडमध्येही उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. सोनू सूदनेही सिंधुला शुभेच्छा दिला. पण हा विजय सोनूसाठी खास आहे.
या वर्ल्ड चॅपियन खेळाडूवर बायॉपिक साकारण्यात येत असून या बायॉपिकला अभिनेता सोनू सूद प्रड्यूस करत आहे. या बायॉपिकवर सोनू गेल्या काही महिन्यांपासून काम करत आहे. या बायॉपिकचे नाव “सिंधु’ असणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
या बायॉपिकबाबत सोनू सूद म्हणाला होता की, कोणताही बायॉपिक साकारताना त्याची स्क्रिप्ट लिहिणे आणि कास्टिंग करणे खूपच अवघड असते. फायनली स्क्रिप्ट तयार करण्यात आली आहे. जर तुम्हाला पीव्ही सिंधूसारख्या खेळाडूची कथा पडद्यावर मांडायची असल्याच तिला न्याय दिला पाहिजे. त्यात कोणतीही चूक राहता कामा नये.
या चित्रपटातील सिंधू आणि तिचे प्रशिक्षक पुलेला गांपीचंद यांच्या भूमिकेतील कलाकाराबाबत विचारले असता सोनू म्हणाला, सिंधुचा रोल कोण साकारणार हे अद्याप निश्चित नाही. पण आमची पहिली पसंती दीपिका पादुकोणला आहे. कारण या भूमिका ती योग्य न्याय देवू शकेल. अद्याप मी दीपिकाशी संपर्क साधला नाही. कारण प्रथम स्क्रिप्टचे काम पूर्ण होणे आवश्यक होते. आता आम्ही दीपिकाला चित्रपटाची स्क्रिप्ट दिलेली आहे, असे सोनूने सांगितले.