Jheel Mehta: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील सोनुने लग्नाच्या दीड वर्षांनंतर दिली ‘गुड न्यूज’
Jheel Mehta:

Jheel Mehta: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ह्या लोकप्रिय शोमध्ये सोनू भिडेची भूमिका अनेकदा बदलली. मात्र सर्वांत आधी या मालिकेत सोनूची भूमिका साकारलेली अभिनेत्री झील मेहता सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
झीलने डिसेंबर 2024 मध्ये आदित्य दुबेशी लग्न केलं होतं. आता लग्नाच्या दीड वर्षांनंतर तिने चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली आहे. झीलने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
झीलने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओच्या सुरुवातीला तिचं पोट दिसून येत आहे. गरोदरपणात जोडपं फोटोसाठी जसा पोझ देतात, तशीच ही पोझ असल्याने चाहत्यांना ‘गुड न्यूज’चा अर्थ प्रेग्नंसी असल्याचं वाटलं. परंतु या व्हिडीओच्या पुढे झीलने खुलासा करत ती प्रेग्नंट नसून ‘गुड न्यूज’ त्यांनी नवीन घर खरेदी केल्याबद्दलची आहे.
View this post on Instagram
व्हिडिओमध्ये झील आणि आदित्य घराची चावी दाखव वेगळ्या पद्धतीने आनंद व्यक्त करतात. यानंतर तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहे. Jheel Mehta
झीलने 2008 मध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत सोनू भिडेची भूमिका साकारली होती. 2012 पर्यंत ती या मालिकेत काम करत होती. त्यानंतर शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिने ही मालिका सोडली. ती सध्या स्टुडंट हाऊसिंग नावाची कंपनी चालवते. तसेच ती तिच्या आईसोबत ब्युटी बिझनेसमध्येही काम करते. Jheel Mehta
हेही वाचा:





