पुणे : आज ग्रामीण जिल्ह्याचे हद्दीत पुणे ते सोलापूर रोडने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून जेजुरी पोलीस स्टेशन येथे सासऱ्याचा खुन केलेल्या गुन्ह्यातील आरोपी जावयाला सुरेश सदाशिव भोसले( वय 40,रा. मिरवडी ता. दौंड जि. पुणे) याला जेरबंद केले. आरोपीने आपल्या बायकोच्या माहेरी (मौजे नाझरे-सुपे ता. पुरंदर जि.पुणे) जाऊन आपल्याकडे नांदायला येत नाही म्हणून चिडून जाऊन भांडण केले. त्यावेळी पत्नीच्या वडिलांचा म्हणजेच किसन देशा काळे (वय 60 वर्षे) यांच्यावर चाकूने हल्ला करून त्यांचा खून केला व फरार झाला आज त्यास मिरवडी (ता. दौंड) येथून सापळा रचून शिताफीने ताब्यात घेऊन अधिकची चौकशी केली असता त्यानेच गुन्हा केल्याची कबुली दिली. पुढील तपासकामी वैद्यकीय तपासणी करून जेजुरी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. सदरची कारवाई ही स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ *पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि रामेश्वर धोंडगे, अमोल गोरे,सफौ.दत्तात्रय जगताप , श्रीकांत माळी,चापोहवा राजापूरे,पोना विजय कांचन ,पोशि धिरज जाधव, अमोल शेडगे, मंगेश भगत ,बाळासाहेब खडके यांनी केली आहे .