Esha Deol : “काहीवेळा लोक तुमच्या निर्णयाशी सहमत नसतात. पण..”; नवऱ्यापासून विभक्त झाल्यानंतर स्पष्टचं बोलली ईशा देओल
Esha Deol : ईशाने देओलने तिचा पती भरत तख्तानी यांच्यापासून परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविषयी तिने आपला विचार मांडला.

Esha Deol : बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल फारशी इंडस्ट्रीत सक्रिय नसली तरी ती तिच्या खाजगी आयुष्यातील काही महत्वाच्या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत नेहमी शेअर करत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी तिचा भाऊ अभिनेता बॅाबी देओल याचा बंदर चित्रपट रिलीज करण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले.
ईशाने देखील हा चित्रपट पाहिला आणि बॅाबीच्या कामाचं कौतुक केलं. यासंदर्भात तिने सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमुळे ईशा चर्चेत आली आहे. या मुलाखतीत तिने आपल्या खाजगी आष्युबाबत मनमोकळेपणाने भाष्य करत आपलं मतं मांडलं.
ईशाने बॅालिवूडमध्ये काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता ती फारशी कुठे चित्रपटांमध्ये दिसत नाही. २०२४ मध्ये तिने एक मोठा निर्णय घेतला होता. त्या निर्णयामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. ईशाने देओलने तिचा पती भरत तख्तानी यांच्यापासून परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविषयी तिने आपला विचार मुलाखतीत मांडला.
ईशा म्हणाली की, “अशा गोष्टी अत्यंत वैयक्तिक असतात आणि त्यात मुलांचाही विचार करावा लागतो. ही दोन व्यक्तींमधील बाब असते. मात्र, आम्ही सार्वजनिक आयुष्यात असल्यामुळे प्रत्येक गोष्ट चर्चेचा विषय बनते. आम्हाला आमचं खासगी आयुष्य सार्वजनिक करायला आवडत नाही. त्या काळात आम्हाला प्रत्येक पाऊल अतिशय विचारपूर्वक उचलावं लागलं, कारण आमची मुलंही या निर्णयाचा भाग होती.”
हेही वाचा : Mumbai : मध्यरात्री पोलिस नियंत्रण कक्षात फोन वाजला अन्…; मुंबईत खळबळ
ईशाने पुढे असंही सांगितलं की, “काहीवेळा लोक तुमच्या निर्णयाशी सहमत नसतात. पण प्रत्येक नात्याची स्वतःची कहाणी असते. जर दोन चांगल्या व्यक्तींनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला, तर परस्पर आदर आणि समजूतदारपणाने पुढचा मार्ग नक्कीच शोधता येतो.”
तसेच कठीण काळात कुटुंबाने दिलेल्या पाठिंब्याचाही तिने उल्लेख केला. विभक्त होण्याच्या निर्णयाबाबत संभ्रमात असलेल्या महिलांना सल्ला देताना ती म्हणाली की, प्रत्येक नातं आणि प्रत्येक परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे सर्वांसाठी एकच सल्ला योग्य ठरू शकत नाही. आयुष्यातील महत्त्वाचे निर्णय घेताना ती इतरांचा सल्ला घेत नाही, असे तिने स्पष्टपणे सांगितलं.
यावर ती म्हणाली, “माझे निर्णय योग्य ठरले किंवा चुकीचे, त्याची जबाबदारी माझीच असते. चित्रपट असो किंवा बॉयफ्रेंड, चुका होतातच. पण त्या चुकांमधूनच आपण शिकतो आणि अधिक खंबीर बनतो.” असे महत्वाचे वक्तव्य केले.
११ वर्षानंतर विभक्त
ईशा देओल आणि भरत तख्तानी यांनी फेब्रुवारी २०२४ मध्ये परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. ११ वर्ष संसार केल्यानंतर त्यांनी हे नाते संपवले. या जोडप्याला राध्या आणि मिराया अशा दोन मुली आहेत; थोरल्या मुलीचा जन्म २०१७ मध्ये, तर धाकट्या मुलीचा जन्म २०१९ मध्ये झाला होता. दोघेही विभक्त झाल्यानंतर आपल्या वेगवेगळ्या वाटेवर आयुष्यात पुढे जात आहेत.
हेही वाचा : Girija Oak: पिवळ्या साडीत गिरिजा ओकचा मोहक अंदाज; ‘नॅशनल क्रश’च्या पारंपरिक लूकने चाहत्यांना घातली भुरळ






