धर्मेंद्र यांच्या निधनानंतर ईशा देओलचे न्यू ईयर सेलिब्रेशन; भाऊ बॉबीची कमेंट चर्चेत, दिली अशी रिएक्शन !

Esha deol | dharmendra | bobby deol : हिंदी चित्रपटसृष्टीचे ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांच्या निधनाला एक महिना पूर्ण झाला आहे. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला, मात्र त्यांचे कुटुंब अजूनही या धक्क्यातून सावरलेले नाही. नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने ईशा देओलने आपल्या वडिलांच्या आठवणीत एक भावूक पोस्ट शेअर केली असून, त्यावर सावत्र भाऊ बॉबी देओलने केलेली कमेंट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
जगभरात ३१ डिसेंबरच्या रात्री नवीन वर्षाचे स्वागत होत असताना, ईशा देओल मात्र आपल्या वडिलांच्या आठवणीत व्याकुळ झाली होती. दुबईत नवीन वर्षाचे स्वागत करताना तिने काही फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत ती आकाशाकडे बोट दाखवून वडिलांना शोधताना दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत तिने आकाशाच्या पार्श्वभूमीवर ‘लव्ह यू पापा’ असे लिहिले आहे. या पोस्टला तिने “तुम्ही नेहमी सुखी, निरोगी आणि बलवान राहा,” असे कॅप्शन देत सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
बॉबी देओलची कमेंट ठरली खास :
ईशाच्या या पोस्टवर तिचा सावत्र भाऊ बॉबी देओलने ‘हृदयाचे (Heart) इमोजी’ पोस्ट करत आपले प्रेम व्यक्त केले. ईशानेही त्याला तितक्याच प्रेमाने प्रतिसाद दिला. देओल कुटुंबातील दोन पिढ्यांमधील हे नाते पाहून चाहते भावूक झाले आहेत. प्रकाश कौर (धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी) आणि हेमा मालिनी यांची मुले जरी वेगळ्या घरात राहत असली, तरी कठीण काळात ते एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले.
दु:खातही देओल कुटुंब एकवटले !
अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर दोन वेगवेगळ्या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते, परंतु मुलांमधील नाते आजही घट्ट आहे. ईशा आणि अहाना यांचे सनी आणि बॉबी देओलशी असलेले सलोख्याचे संबंध अनेकदा दिसून आले आहेत. सनी देओलच्या ‘गदर २’ च्या वेळी ईशाने पुढाकार घेऊन स्क्रीनिंग आयोजित केले होते. आता वडिलांच्या निधनानंतरही ही भावंडे एकमेकांना आधार देताना दिसत आहेत.





