Esha Deol: वडील धर्मेंद्र यांच्या निधनानंतर ईशा देओल पुन्हा कामावर; म्हणाली… “मुलगी म्हणून मला चुकीचं समजू नका”

Esha Deol : बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर देओल कुटुंबावर मोठं दुःख कोसळलं आहे. त्यांच्या जाण्याने केवळ कुटुंबीयच नाही, तर संपूर्ण चित्रपटसृष्टी शोकात आहे. अशा कठीण काळात धर्मेंद्र यांची मुलगी अभिनेत्री ईशा देओल पुन्हा कामावर परतली असून, तिने याबाबत स्वतः सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
ईशा देओलने इंस्टाग्रामवर तिच्या एका फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, हा शूट नोव्हेंबरमध्येच रिलीज होणार होता. त्या वेळी तिने एका मॅगझिनच्या कव्हरसाठी शूट केले होते, त्यामुळे आता ते फोटो शेअर करत आहे. पुढील काळात या सिझनसाठी आणखी काही अपडेट्सही ती शेअर करणार असल्याचं तिने सांगितलं आहे.
View this post on Instagram
या पोस्टसोबतच ईशाने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे खास अपील केली आहे. तिने म्हटलं आहे की, “मला एक मुलगी किंवा एक माणूस म्हणून चुकीचं समजू नका. मी फक्त माझ्या आधी दिलेल्या कमिटमेंट्स पूर्ण करत आहे. यासाठी मला कोणीही जज करू नये.”
ईशा देओलच्या या भावनिक पोस्टवर अनेक चाहत्यांनी तिचं धैर्य आणि प्रामाणिकपणाचं कौतुक केलं आहे. दुःखाच्या काळातही जबाबदाऱ्या पूर्ण करणं सोपं नसतं, असं म्हणत नेटकऱ्यांनी तिला पाठिंबा दिला आहे.





