Esha Deol: ‘तुमची आठवण येते पप्पा’… धर्मेंद्र यांच्या वाढदिवशी ईशा देओल भावुक

Esha Deol: बॉलिवूडचे महान अभिनेते धर्मेंद्र यांचा आज वाढदिवस. 24 नोव्हेंबरला त्यांचं निधन झाल्यानंतर कुटुंबासह चाहत्यांमध्ये मोठा शोक होता. आज ते 90 वर्षांचे झाले असते. या दिवशी त्यांच्या मुलीने, ईशा देओलने, त्यांना आठवत काही फोटो आणि मनाला भिडणारा संदेश लिहिला आहे.
ईशाचा भावनिक संदेश
धर्मेंद्र यांच्या जुन्या फोटोंसोबत ईशा लिहिते, “माझे पप्पा… आपलं नातं खूप घट्ट आहे. तुमची आठवण माझ्या प्रत्येक श्वासात आहे. तुम्ही स्वर्गात असलात तरी मी तुम्हाला माझ्या हृदयात जपून ठेवले आहे. तुमच्या आठवणी, शिकवण, आपुलकी, ऊब सगळं माझ्यासोबत आहे.”
View this post on Instagram
ती पुढे म्हणते,
“मला तुमची खूप आठवण येते पप्पा… तुमचे मजबूत पण मायेचे हात, माझं नाव घेऊन तुम्ही बोलवायची ती पद्धत, आपल्या गप्पा, हसणं, शायरी हे सगळं फार मिस करते. तुमचा मंत्र नम्र रहा, आनंदी रहा, निरोगी रहा मी कायम पाळेन. तुमची परंपरा अभिमानाने पुढे नेईन. मी तुम्हाला खूप प्रेम करते पप्पा… तुमची बिट्टू.”
बिग बॉस 19 मध्येही धर्मेंद्र यांची आठवण
बिग बॉस 19 च्या फिनालेदरम्यान सलमान खान यांनीही धर्मेंद्र यांचा उल्लेख केला. ते म्हणाले की, “त्या दिवशी सर्व जण रडत होते, पण त्याचबरोबर धर्मेंद्रजींच्या सुंदर आयुष्याचं एक शांत, आदरयुक्त सेलिब्रेशनही होतं. सनी आणि बॉबी दोघांना सलाम.” सलमान बोलताना शोमधील सर्व स्पर्धक धर्मेंद्र यांच्या सन्मानार्थ उभे राहिले. या सीझनचा विजेता गौरव खन्ना ठरला.





