Gauri Garje Death Case | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गर्जेची पत्नी डॉ. गौरी पालवेने वरळी येथील राहत्या घरी आत्महत्या केली. ती शनिवारी संध्याकाळी घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. मात्र, तिचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप गौरी गर्जे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी अनंत गर्जे, त्यांची बहीण शीतल गर्जे- आंधळे आणि दीर अजय गर्जे यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांवर त्रास देणे, अपमान करणे आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यानंतर मध्यरात्री वरळी पोलिसांनी गाैरी पालवे यांचा पती आणि पंकजा मुंडेचा पीए अनंत गर्जेला अटक केली आहे. रात्री 1 वाजता अनंत गर्जेला वरळी पोलिसांच्या पथकाने अटक केली. अनंत गर्जे यांना सोमवारी न्यायालयात हजर केले जाईल. त्यावेळी अनंत गर्जे यांची पोलीस कोठडी मिळवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. या प्रकरणातील इतर दोन आरोपींना अटक करण्यात आली की नाही, याबाबत माहिती समोर आलेली नाही. दरम्यानम पत्नीला रुग्णालयात दाखल करुन अनंत गर्जे फरार झाल्याचा आरोप गौरी गर्जे- पालवे यांच्या कुटुंबियांनी केला होता. अशातच आता पत्नीच्या मृत्यू घटनेनंतर अनंत गर्जे आज मध्यरात्री वरळी पोलिस स्थानकात हजर झाले. त्यांनी पोलिसांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतला असून पुढील तपास सध्या सुरु आहे. Gauri Garje Death Case | गाैरी गर्जे यांच्या कुटुंबियांकडून गंभीर आरोप गाैरी गर्जे यांच्या कुटुंबियांकडून अनेक गंभीर आरोप अनंत गर्जे आणि त्याच्या बहीण भावावर करण्यात आली. एका महिलेसोबत अनंतचे अफेअर सुरू होते आणि याची कल्पना गाैरीला लागली. यावरून दोघांमध्ये प्रचंड वाद सुरू होता. हेच नाही तर गाैरीने त्याला माफही केले होते. मात्र, तो चॅटिंग करत असल्याचे तिच्या लक्षात आल्याने ती त्रासात होती. हेच नाही तर गर्भपाताचा एक रिपोर्टही गाैरीला मिळाला होता. ज्यामध्ये पतीच्या नावे अनंत गर्जेचे नाव होते. गाैरीने या सर्व गोष्टींची कल्पना आपल्या कुटुंबियांना दिली. गाैरीला अनंतने अनेकदा मारहाण केली होती. गाैरी यांचे आई-वडील बीडहून थेट त्यांच्या घरी पोहोचल्यानंतर गाैरी यांच्या चेहऱ्यावर आणि मानेवर वण त्यांना दिसून आले होते, असेही सांगण्यात आले आहे. Gauri Garje Death Case | हेही वाचा: पुण्यात बिबट्याची दहशत! लोहगाव विमानतळ आणि औंधमध्ये बिबट्या दिसला; वनविभागाचा हाय अलर्ट