Solapur DCC Bank Election : रणजितसिंह मोहिते पाटलांसह १० माजी संचालकांचे अर्ज बाद; परिचारक, संजयमामांना धक्का, खा. धैर्यशील मोहितेंचा अर्ज वैध
Solapur DCC Bank Election : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (DCC Bank) बहुचर्चित निवडणुकीत छाननी प्रक्रियेदरम्यान राजकीय वर्तुळाला हादरवून टाकणारा मोठा निर्णय समोर आला आहे.

Solapur DCC Bank Election : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील निवडणुकांच्या रणधुमाळीत मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. येथील निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आज अर्जांची छाननी करण्यात आली. त्यामध्ये, माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासह अनेक दिग्गजांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. (Solapur DCC Bank Election)
रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासह बँकेचे माजी संचालक माजी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार प्रशांत परिचारक, ज्येष्ठ नेते सुरेश हसापुरे यांचेही अर्ज निवडणुकीतून बाद झाले आहेत. (Solapur DCC Bank Election)
यापूर्वी, बेकायदेशीर कर्जवाटप करत बँकेच्या आर्थिक नुकसानीस जबाबदार असल्याने माजी संचालकावर 2024 साली कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतून 10 माजी संचालकांचे अर्ज बाद ठरवण्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी घेतला. (Solapur DCC Bank Election)
दरम्यान, राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील यांचा अर्ज मात्र वैध ठरवल्याने मोहिते पाटील कुटुंबाला काहीसा दिलासा मिळाला आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत एकूण 201 उमेदवारांनी 238 अर्ज दाखल केले होते. (Solapur DCC Bank Election)
त्यातील 41 अर्ज बाद तर 30 अर्ज दुबार आहेत, त्यामुळे या निवडणुकीत एकूण 167 अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. वैध ठरवण्यात आलेल्या उमेदवारांना 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. त्यामुळे, सोलापूर डीसीसी बँक निवडणुकीत कोण-कोण अर्ज माघार घेते हे देखील पाहावं लागेल. (Solapur DCC Bank Election)





