खटाव, (प्रतिनिधी) – सध्याचे युग हे गतिमान असून विविध क्षेत्रात सातत्याने स्पर्धा पहावयास मिळते आहे. वर्तमान पिढी सोशल मीडियाच्या अधिक विळख्यात अडकताना दिसून येत. समाजात विकृत मानसिकता वाढते आहे ही अतिशय गंभीर बाब असून ज्ञान, सत्यशोधक भूमिका, मानवता, करुणा, सहानुभव, चारित्र्य या मूल्यांच्या रुजवणुकीसाठी समर्पित भावनेने जीवन जगलेले चंद्रहार पाटील यांच्या विचारांची व तत्वांची समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य अरविंद येलपले यांनी केले. खटाव येथील चंद्रहार पाटील ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक माजी आमदार कै. चंद्रहार पाटील यांच्या ९१ व्या जयंती शहाजीराजे महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सेवानिवृत्त प्रा. डॉ. एस. ए. जाधव, प्रा. डॉ. यू. आर. जाधव, प्रा. आर. बी. पवार, प्रा. आर. के. साखरे, प्रा. एस. वाय. फडतरे, प्रा. एल. ए. काझी, प्रा. डॉ. पी. डी. कुलकर्णी, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. के. बी. जाधव, प्रा. डॉ. जे. पी. कदम, प्रा. आर. एन. खराडे, के. सी. इनामदार, माजी विद्यार्थी,प्राध्यापक प्राध्यापिका ,प्रशासकीय कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी प्रा. डाॅ. उदय जाधव यांनी दादांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा सविस्तरपणे आढावा घेत आठवणींना उजाळा दिला तर पी.डी. कुलकर्णी यांनी दादांच्या विचारांचा आदर्श पुढे चालू ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. डॉ. जे. पी. कदम यांनी प्रास्ताविक केले. प्रा. के बी. जाधव यांनी आभार मानले. प्रा. डॉ. बी. बी. राठोड यांनी सूत्रसंचालन केले.