nagar | इफ्तार पार्टीच्या माध्यमातून सामाजिक एकोपा – आ. कानडे

श्रीरामपूर, (प्रतिनिधी)- रमजान महिन्याचे पवित्र उपवास करून मुस्लिम बांधव अल्लाहतआलाची इबादत करतात. पवित्र रमजानच्या पर्वात आपली गंगा, जमुना संस्कृती जपण्यासाठी आपण सर्व एकत्र येतो. यातूनच सामाजिक एकोपा निर्माण होतो. समाजामध्ये हा एकोपा असाच कायम राहावा,यानिमित्ताने सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देऊन आपला हा सामाजिक सलोखा दृढ व्हावा, असे प्रतिपादन आमदार लहु कानडे यांनी केले.
आ. कानडे परिवार, आ. कानडे मित्रमंडळ तसेच श्रीरामपूर काँग्रेस कमिटीतर्फे येथील जामा मशिदीत आयोजित केलेदादअली, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, माजी नगरसेवक अशोक कानडे, विधानसभा समन्वयक प्रविण काळे, माजी नगरसेवकल्या इफ्तार कार्यक्रमप्रसंगी आ. कानडे बोलत होते. यावेळी उद्योजक अंकुश कानडे, जामा मशीदीचे मौलाना मोहम्मद इम अंजुम शेख, मुजफ्फर शेख, राजेश अलघ, मुख्तार शाह, कलीम कुरेशी, प्रकाश ढोकणे, शिवसेना नेते अशोक थोरे, संजय छल्लारे, लखन भगत आदी उपस्थित होते.
इफ्तार कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा जपण्याचे कार्य होत असून श्रीरामपूरातील हिंदू-मुस्लिम एकता भविष्यातही अशीच कायम राहावी, अशी अपेक्षा याप्रसंगी आ. कानडे यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर व शिवसेना नेते अशोक थोरे यांनी देखील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
जामा मशीद ट्रस्टतर्फे यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच कानडे परिवारातर्फे मौलाना इमदाद अली व इतर मौलवींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रज्जाक पठाण यांनी केले तर माजी नगरसेवक अंजुम शेख यांनी आभार मानले.
इफ्तार कार्यक्रमासाठी सतीश बोर्डे, सचिन जगताप, सुरेश पवार, हरिभाऊ बनसोडे, अमोल आदिक, नानासाहेब रेवाळे, विजय शेळके, दीपक कदम, दिनकर बनसोडे आदींसह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.





