Asaduddin Owaisi : भाजप आणि मोदींना हरवा आणि देवेंद्र फडणवीस यांना सत्तेतून घालवा, असे आवाहन ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाचे सर्वेसर्वा आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले. कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सभेतून ओवेसींनी भाजपवर टीकास्त्र डागले. ही वेळ मुसलमानांनी सतर्क राहण्याची आहे. मुसलमानांनो तुम्ही तुमची राजकीय लीडरशिप तयार करा, तुम्ही एकत्र व्हा. असेही आवाहन त्यांनी या सभेतून केले. ओवेसींच्या कोल्हापूरातील सभा व जाहीर कार्यक्रमांना हिंदुत्ववादी संघटनांकडून कडाडून विरोध करण्यात आला होता. मात्र, पोलिस बंदोबस्तात ओवेसींचा दौरा पार पडला आणि सभाही झाली. आज मला कोल्हापूरमध्ये येऊ देण्यास विरोध करण्यात आला. मला त्यांना सांगायचं आहे तुम्ही अजून बच्चे आहात, तुमचे दुधाचे दात अजून पडले नाहीत, असे विरोध करणाऱ्यांना ओवीसींना ठणकावले. तसेच मी पाकिस्तानमध्ये जाऊन बोलणार व्यक्ती असल्याचे देखील ओवेसी यावेळी बोलताना म्हणाले. मोदीजी हा तुमचा गैरसमज पोलिसांनी प्रभोभक भाषण करू नका असे सांगितले. आम्ही प्रक्षोभक भाषण करत नाही. मात्र, राज्यातील सत्ताधारी नेते रोज महाराष्ट्रात प्रक्षोभक भाषण करत आहेत, असा आरोप करत त्याच्यांवर तुम्ही काय कारवाई करता? असा सवालही ओवेसींनी केला. भाजपा मुस्लिमांचा इतका तिरस्कार का करतो? मस्जिद आणि दर्गापासून आम्ही मुसलमानांना लांब करतोय असं मोदींना वाटत असेल. मात्र, मोदीजी हा तुमचा गैरसमज आहे. आम्ही कायम मशीद आणि दर्ग्यासाठी जगू आणि मरु. सगळ्यांना जीव आहे हे लक्षात ठेवा. आम्ही सगळ्यांना वेळ आल्यावर उत्तर देऊ, असे रोखठोक भाष्य ओवेसींनी केले. मोठा आरोप छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांचे राजकीय नेतृत्व टिकू नये शिंदे, शरद पवार, अजित पवार, फडणवीस, ठाकरे सगळे एकत्र झाले, असा मोठा आरोपही ओवेसींनी यावेळी बोलताना केला. तसेच तुम्ही जर सो कॉल्ड पुरोगामी पक्षांना मतदान करत असाल तर तुम्ही त्यांना जाब विचारू शकत नाही, असेही ते म्हणाले. हा देश कुणाच्या बापाचा नाही, सर्वांना समान अधिकार आहेत. ओवेसी यांच्या सभेला विरोध केल्यानंतर यावर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोल्हापूरातील पत्रककारांशी बोलताना त्यांनी “हा देश कुणाच्या बापाचा नाही, सर्वांना समान अधिकार आहेत” अशा कठोर शब्दांत हिंदुत्ववादी संघटनांवर टीका केली. नवरात्रीत मुस्लिम युवकांना दांडियापासून दूर ठेवण्यासारखे चुकीचे निर्णय घेतला असल्याचे देखील जलील म्हणाले. हेही वाचा : “हिंदू मंदिरांची पुरग्रस्तांसाठी कोट्यवधी रुपयांची मदत, पण दर्गा-मशिदी मागे का?”; भाजपचा थेट सवाल