Mahesh Shinde : कोरेगावात रंगली भव्य इफ्तार पार्टी; आमदार महेश शिंदेंनी मुस्लिम बांधवांसाठी केली मोठी घोषणा
Mahesh Shinde : आमदार महेश शिंदे यांच्याकडून मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधीचे आश्वासन; कोरेगावात सामाजिक ऐक्याचे दर्शन.

Mahesh Shinde – ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईद या मुस्लिम समाजाच्या सर्वात मोठ्या उत्सवानिमित्त कोरेगावात आयोजित इफ्तार पार्टीत सामाजिक ऐक्य व बंधुभावाचा संदेश देण्यात आला. दत्तनगर येथे बुधवारी रात्री झालेल्या या कार्यक्रमात आमदार महेश शिंदे यांनी मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे व नगरसेवक साईप्रसाद बर्गे यांच्या पुढाकाराने,
राहुल दादा बर्गे मित्र मंडळ आणि आमदार महेश दादा शिंदे विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार शिंदे बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री होते. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे, कोरेगाव खरेदी विक्री संघाचे संचालक उदयसिंह बर्गे, माजी उपसभापती भास्कर कदम, माजी सदस्य रवींद्र बोतालजी, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, माजी नगरसेवक सचिनभैय्या बर्गे, नितीन उर्फ बच्चूशेठ ओसवाल, रशीद शेख यांच्यासह अल्पसंख्यांक विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष शाहरुख शेख व मुस्लिम समाजबांधव उपस्थित होते.
कोरेगाव शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विकासकामे हाती घेण्यात आली असून ती लवकरच पूर्णत्वास जातील. मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी आणि हितासाठी आपण नेहमीच कटिबद्ध राहणार असल्याचेही आमदार महेश शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी राहुल प्रकाश बर्गे, हमीद मुल्ला, वाजिदभाई मौलाना यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास नगरसेवक साईप्रसाद बर्गे, ॲड. अमोल भुतकर, सागर बर्गे, सागर विरकर, संतोष बर्गे, डॉ. विघ्नेश बर्गे, राजेंद्र वैराट, अनिकेत सूर्यवंशी, महेश शामराव बर्गे, दीपक फडके, दीपक कांबळे, विजय घोरपडे, अजित विलासराव बर्गे, आयुब शेख, वारीस कुरेशी, अल्ताफ मुल्ला यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.
रोजा हा त्याग, संयम, श्रद्धेचे प्रतीक
आ. महेश शिंदे म्हणाले की, रमजान महिन्यातील रोजा हा त्याग, संयम आणि अल्लाहवरील श्रद्धेचे प्रतीक आहे. कोरेगावातील मुस्लिम समाजाच्या विकासासाठी इतिहासात पहिल्यांदाच ठोस पावले उचलली असून, नगरपंचायतीत प्रतिनिधित्व देऊन त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. समाजाच्या गरजांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, भविष्यातही आवश्यक तेवढा निधी देण्यात येईल.





