“…तर शिंदेसेना भाजपमध्ये विलीन होईल, एकनाथ शिंदेंचे…”; प्रसिद्ध वकील असीम सरोदे नेमकं काय म्हणाले?

Asim Sarode’s post : शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत उद्या २१ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. या सुनावनीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला पक्षाचे अधिकृत नाव “शिवसेना” आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह बहाल केले होते. या निर्णयाला उद्धव ठाकरे गट (शिवसेना UBT) यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
आता या प्रकारणीची सुनावणी २१ जानेवारीला सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जोयमलया बागची यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर पार पडणार आहे. उद्याच्या सुनावणी अगोदर प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी एक्सवरून ट्वीट शेअर करत मोठा दावा केला आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह. सुनावणीची तारीख उद्या सुप्रीम कोर्टात आहे. पण 37 नंबरचे मॅटर सुनावणीसाठी reach होणे कठीण आहे, असे असीम सरोदे यांनी म्हटले आहे.
आता लोकांचा नवीन प्रश्न – जर एकनाथ शिंदेंकडून पक्ष चिन्ह व शिवसेना नाव काढून घेतले तर मुंबई महापालिकेत काय होईल? मला वाटते शिंदेसेना भाजपमध्ये विलीन होईल व एकनाथ शिंदे यांचे राजकीय महत्व एकदम कमी होईल, अशी शक्यता असीम सरोदे यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी केलेल्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह. सुनावणीची तारीख उद्या सुप्रीम कोर्टात आहे पण 37 नंबरचे मॅटर सुनावणीसाठी reach होणे कठीण आहे. आता लोकांचा नवीन प्रश्न – जर एकनाथ शिंदेंकडून पक्ष चिन्ह व शिवसेना नाव काढून घेतले तर मुंबई महापालिकेत काय होईल? मला वाटते शिंदेसेना भाजपमध्ये…
— Asim Sarode (@AsimSarode) January 20, 2026
या पोस्टमध्ये असीम सरोदे यांनी असेही म्हटले आहे की, शिंदेसेनेतील अनेकजण उद्धव ठाकरेंकडे स्वगृही परत जातील व मूळ शिवसेना अधिक ताकदवान होईल. उद्धव आणि राज ठाकरे मिळून मुंबई महापालिकेतील राजकारण फिरवू शकतील. सर्वोच्च न्यायालयातील एका निर्णयामुळे सुरु झालेला खेळ सर्वोच्च न्यायालयाच कधीतरी संपवेल, असेही सरोदे म्हणाले आहेत. २२ जानेवारीला २९ महापालिकांसाठी आरक्षण सोडत जाहीर केले जाणार असून दुसरीकडे २१ तारखेला शिवसेना पक्षाच्या निवडणूक चिन्हाची सुनावणी पार पडणार आहे. यामुळे अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.
सुनावणीत काय होणार?
प्रत्येक गटाला ३ तास युक्तिवाद करण्याची संधी मिळणार आहे. या सुनावणीनंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘घड्याळ’ चिन्हावरील वादाचीही सुनावणी होऊ शकते. कारण दोन्ही प्रकरणांत काही समान मुद्दे आहेत.
हेही वाचा : राज्याच्या औद्योगिक विकासाला वेग मिळणार; 35 लाख नोकऱ्यांची संधी; फडणविसांचा दावोसमध्ये कोट्यवधींचे करार





