Devendra Fadnavis at Davos | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत प्रतिनिधीमंडळासमवेत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीकरिता स्वित्झर्लंडमधील दावोस येथे दाखल झाले आहेत. फडणवीस यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये राज्यासाठी मोठी गुंतवणुक मिळवली आहे. स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकार, एमएमआरडीए आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये अनेक सामंजस्य करार करण्यात आले. त्यांनी आतापर्यंत 7 लाख कोटींचा करार दावोसमध्ये केला आहे. याद्वारे उद्योग, पायाभूत सुविधा, रिअल इस्टेट, स्मार्ट सिटी क्षेत्रात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार आहे. यामुळे राज्याच्या औद्योगिक विकासाला वेग मिळणार आहे. गेल्या दशकात महाराष्ट्राने सातत्याने 10 टक्क्यांहून अधिक विकासदर राखला असून हीच गती कायम राहिल्यास, 2032 ऐवजी 2030 पर्यंतच महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट गाठेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. Devendra Fadnavis at Davos | 35 लाख उच्च वेतनाच्या नोकऱ्या निर्माण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात एज्यु-सिटी, इनोव्हेशन सिटी, स्पोर्ट्स सिटी आणि मेडिसिटी यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारले जात आहेत. या क्लस्टरमुळे सुमारे 35 लाख उच्च वेतनाच्या नोकऱ्या निर्माण होतील, असा अंदाज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीत ते बोलत होते. तसेच जागतिक स्तरावर महाराष्ट्राची विश्वासार्हता पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून, विदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे भारताचे खरे ‘गेटवे ऑफ इंडिया’ आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. सुमारे 10 ते 12 विविध क्षेत्रांतील उद्योगांशी सध्या समन्वय साधला जात आहे. दावोस करारांच्या बाबतीत 75 ते 80 टक्क्यांपर्यंत पोहोचले दरम्यान, गेल्या वर्षी महाराष्ट्रात तब्बल 16 लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले. यात प्रत्यक्ष गुंतवणुकीत रूपांतरित व्हावेत यासाठी राज्याने स्वतंत्र ट्रॅकिंग यंत्रणा उभारली आहे. देशपातळीवर जिथे सामंजस्य करारांचे रूपांतरण प्रमाण 25 ते 30 टक्के असते, तिथे महाराष्ट्रात हे प्रमाण 50 ते 55 टक्के असून, दावोस करारांच्या बाबतीत 75 ते 80 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. जमीन वाटप, मंजुरी प्रक्रिया, तसेच ‘वॉर रूम’च्या माध्यमातून प्रत्येक गुंतवणूकदाराला उद्योग क्षेत्राशी जोडून ठेवण्यात येत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. Devendra Fadnavis at Davos | कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), डेटा, फ्रंटियर टेक्नॉलॉजी या क्षेत्रांमध्ये भारत, विशेषतः महाराष्ट्र आघाडी घेऊ शकतो. त्याचबरोबर, महाराष्ट्रात देशातील 60 टक्के डेटा सेंटर क्षमता असून, महाराष्ट्र आता भारताची ‘डेटा सेंटर कॅपिटल’ बनले आहे. हरित ऊर्जेवर आधारित, उच्च दर्जाची वीजपुरवठा व्यवस्था उभारून ही क्षमता आणखी वाढवली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. Devendra Fadnavis at Davos | हेही वाचा: महापौर आरक्षणाची सोडत गुरुवारी, कर्नाटकचे डीजीपी रामचंद्र राव सस्पेंड…अशा टॉप १० बातम्या वाचा एका क्लिकवर