India vs Sri Lanka Schedule 2024 : झिम्बाब्वे दौऱ्यानंतर जुलै महिन्याच्या अखेरीस भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया यजमान श्रीलंकेसोबत फक्त 3 वनडे आणि 3 टी-20 सामने खेळणार आहे. दोन्ही मालिकांचे वेळापत्रक आधीच जाहीर झाले होते, मात्र आता त्यात थोडा बदल करण्यात आला आहे.
जुन्या वेळापत्रकानुसार ही मालिका 26 जुलैपासून सुरू होणार होती, मात्र आता 27 जुलैपासून ही मालिका सुरू होणार आहे. एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या 2 सामन्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, परंतु पहिला एकदिवसीय सामना आता 1 ऑगस्ट ऐवजी 2 ऑगस्ट रोजी खेळवला जाईल. T20 मालिकेतील तीनही सामने पल्लेकेले स्टेडियमवर आणि तीन एकदिवसीय सामने कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवले जातील.
काय बदल झाले आहेत?
जुन्या वेळापत्रकानुसार, तिन्ही टी-20 सामन्यांच्या तारखा 26 जुलै, 27 जुलै आणि 29 जुलै रोजी ठेवण्यात आल्या होत्या. आता तिन्ही सामन्यांच्या तारखा एका दिवसासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत, त्यामुळे आता अनुक्रमे 27 जुलै, 28 जुलै आणि 30 जुलै रोजी तीन टी-20 सामने खेळवले जातील. दुसरा आणि तिसरा एकदिवसीय सामना अजूनही अनुक्रमे 4 आणि 7 ऑगस्ट रोजी खेळला जाईल, परंतु पहिल्या एकदिवसीय सामन्याची तारीख बदलून 1 ऑगस्ट वरून 2 ऑगस्ट करण्यात आली आहे.
UPDATE 🚨
A look at the revised schedule for #TeamIndia‘s upcoming tour of Sri Lanka #SLvIND pic.twitter.com/HLoTTorOV7
— BCCI (@BCCI) July 13, 2024
नवीन वेळापत्रक …
पहिला टी-20 सामना – 27 जुलै – संध्याकाळी 7 वाजता
दुसरा टी-20 सामना – 28 जुलै – संध्याकाळी 7 वाजता
तिसरा टी-20 सामना – 30 जुलै – संध्याकाळी 7 वाजता
पहिला वनडे सामना – 2 ऑगस्ट – दुपारी 2.30 वाजता
दुसरा वनडे सामना – 4 ऑगस्ट – दुपारी 2.30 वाजता
तिसरा वनडे सामना – 7 ऑगस्ट – दुपारी 2.30 वाजता
Wimbledon Open 2024 (Women’s) : चेक प्रजासत्ताकची क्रेजिकोव्हा ठरली विम्बल्डनची ‘क्विन’
या दौऱ्यापासून सुरू होईल गंभीरचा कार्यकाल…
भारतीय क्रिकेट बोर्डाने माजी दिग्गज फलंदाज गौतम गंभीरची टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. गंभीर भारताच्या श्रीलंका दौऱ्यापासून जबाबदारी स्वीकारणार आहे. श्रीलंकेविरुद्धची तीन सामन्यांची टी-20 मालिका ही गौतम गंभीरची प्रशिक्षक म्हणून पहिली असाइनमेंट असेल. खरंतर रोहित शर्माने टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. अशा परिस्थितीत आता टीम इंडिया नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. बीसीसीआयने अद्याप श्रीलंका दौऱ्यासाठी टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर केलेला नाही.