SL vs BAN : शतकानंतर आक्रमक सेलिब्रेशन करताना शांतोची अचानक उडाली भंबेरी, VIDEO होतोय व्हायरल

SL vs BAN Najmul Hossain Shanto Celebration Viral : बांगलादेशने गॅले येथे श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दमदार सुरुवात केली आहे. हा सामना २०२५-२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) स्पर्धेचा भाग आहे. पहिल्या दिवशी बांगलादेशने दमदार फलंदाजी करताना ३ गडी गमावून २९२ धावा केल्या. नजमुल हुसेन शांतो(१३६) आणि मुशफिकुर रहीम (१०५) यांनी शानदार शतकी खेळी केल्या. ज्यामुळे बांगलादेशच्या पहिल्या डावाला बळकटी मिळाली. दरम्यान बांगलादेशच्या कर्णधाराचा शतकानंतरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
पहिला दिवस बांगलादेशच्या फलंदाजांनी गाजवला –
श्रीलंकेचा गोलंदाज थारिंदु रत्नायकेने सामन्याच्या सुरुवातीला बांगलादेशचे दोन गडी झटपट बाद करत त्यांना अडचणीत आणले होते. त्याने शादमान इस्लामला बाद केले आणि आणखी एक विकेट घेत बांगलादेशची धावसंख्या ४५ धावांवर ३ बाद असा केला होता. यानंतर शांतो आणि मुशफिकुरने एकत्र येत श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी २४७ धावांची नाबाद भागीदारी केली. या दरम्यान कर्णधार शांतोने शतक झळकावल्यांतर जबरदस्त सेलिब्रेशन केले, ज्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
शांतोची अचानक उडाली भंबेरी –
Next level celebration 🔥🔥🤣
Celebration Warh jane lage thi🤣#SLvBAN pic.twitter.com/IQ1OY8a1lf— Shah Jahan 56 (@ShahJahanba56) June 17, 2025
बांग्लादेशच्या पहिल्या दिवसाच्या खेळानंतर एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शांतो शतक पूर्ण केल्यानंतर उत्साहात उडी मारून जल्लोष केला. तो आक्रमकपणे उत्सव साजरा करत असतानाच, अचानक एक चेंडू त्याच्याकडे वेगाने येतो. हे पाहून तो घाबरतो आणि मोठ्या मुश्किलीने स्वतःला सावरत चेंडूपासून वाचतो. त्यानंतर तो आपला जल्लोष पूर्ण करतो. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा – T20 World Cup : ICC टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर! भारत-पाकिस्तान सामना कधी? जाणून घ्या
कर्णधार शांतोला लाभली अनुभवी मुशफिकुरची साथ –
दरम्यान, या सामन्यात कर्णधार शांतोला अनुभवी फलंदाज मुशफिकुरने उत्तम साथ दिली. या दोन्ही फलंदाजांनी शतके झळकावली आणि बांग्लादेशला मजबूत स्थितीत आणले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा शांतो १३६ आणि मुशफिकुर १०५ धावांवर नाबाद होते. एकेकाळी अडचणीत सापडलेल्या बांगलादेश संघाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत २९२ धावा उभारल्या होत्या. अँजेलो मॅथ्यूजच्या अखेरच्या कसोटी सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांना सुरुवातीच्या यशाला पुढे टिकवता आले नाही.
हेही वाचा – Karun Nair : टी-२० लीगच्या पैशापेक्षा स्वप्न मोठं: करुण नायरने सांगितली मनाला भिडणारी कहाणी
प्रभात जयसूर्या आणि थारिंदु रत्नायके या फिरकी जोडीने एकत्रितपणे ६१ षटके गोलंदाजी केली, पण केवळ दोन विकेट घेऊ शकले. पाच गोलंदाजांसह खेळत असतानाही श्रीलंकेच्या गोलंदाजांना घरच्या मैदानावर फारसे यश मिळाले नाही. आता बांगलादेश मोठा स्कोर उभारण्याच्या स्थितीत आहे. त्यांनी डब्ल्यूटीसीच्या या नव्या चक्राला चांगली सुरुवात केली आहे.





