Karun Nair Inspiring Comeback to Indian Test Team : भारत आणि इंग्लंड संघातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला २० जूनपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ कसून सराव करत आहेत. करुण नायर याने २०१८ नंतर तब्बल सात वर्षांनी पुन्हा भारतीय संघात पुनरागमन केले आहे. या कालावधीत त्याला संघात परतण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. आता करुण नायरने आपल्या कठीण काळाची आठवण सांगताना खुलासा केला की, एका माजी खेळाडूने त्याला निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला होता.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पुनरागमन करणाऱ्या करुण नायरला एका माजी क्रिकेटपटूने काही काळापूर्वी निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला होता. त्यामागील कारण असे होते की, निवृत्ती घेऊन करुण लीग क्रिकेटमधून चांगली कमाई करू शकतो. मात्र, करुण नायरने हा सल्ला स्वीकारला नाही आणि आजच्या घडीला आपल्या या निर्णयावर तो खूप समाधानी आहे.
माजी क्रिकेटपटूने निवृत्तीबाबत केला होता फोन –
🇮🇳 Karun Nair revealed a prominent Indian cricketer once told him to retire and chase money in T20 leagues.
Now, after 8 years, he’s back in India’s Test squad for the England series 🏏🔥
Source: Mail Sport#KarunNair #TeamIndia #CricketNews #HKChronicle pic.twitter.com/gWHgi3bK7W— HK Chronicle (@HK_Chronicle_) June 16, 2025
करुण नायरने डेली मेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मला अजूनही आठवतंय, एका प्रमुख भारतीय क्रिकेटपटूने मला फोन करून सांगितलं होतं की तू निवृत्ती घ्यावीस, कारण या टी-२० लीगमधून मिळणारा पैसा तुझं भविष्य सुरक्षित करेल. असं करणं सोपं आहे, पण मला माहित होतं की पैशांच्या मागे जाऊन मी इतक्या सहजासहजी निवृत्ती घेतली तर मी स्वतःलाच दोष देईन.”
मी हार मानली नाही – करुण नायर
त्याच मुलाखतीत करुण नायर पुढे म्हणाला, “मी पुन्हा भारतासाठी खेळण्याची आशा सोडली नव्हती. ही फक्त दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, आणि आता पाहा, आपण कुठे आहोत. हे वेडेपण आहे, पण मला आतून माहित होतं की मी खूप चांगली काम करत आहे.” २०१८ मध्ये भारतीय संघातून बाहेर पडल्यानंतर करुण नायरने अनेकवेळा काउंटी क्रिकेटमध्ये भाग घेतला आणि तिथे उल्लेखनीय कामगिरी केली. विजय हजारे ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफीमध्येही त्याने आपल्या आकर्षक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले.