T20 World Cup : ICC टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर! भारत-पाकिस्तान सामना कधी? जाणून घ्या

ICC Women’s T20 World Cup 2026 : आयसीसीने महिला टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. हा विश्वचषक पुढील वर्षी होणार आहे. वेळापत्रक जाहीर होताच प्रत्येक संघ कोणत्या गटात आहे हेही निश्चित झाले आहे. विशेष बाब म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांना पुन्हा एकाच गटात स्थान देण्यात आले आहे. या दोन्ही संघांमधील महामुकाबला कधी होणार याची तारीखही समोर आली आहे.
पुढील वर्षी इंग्लंडमध्ये खेळला जाणार महिला टी20 विश्वचषक –
महिला टी-२० विश्वचषक पुढील वर्षी इंग्लंडमध्ये आयोजित होणार आहे. हा विश्वचषकाचा १०वा हंगाम असेल. जूनमध्ये होणाऱ्या या विश्वचषकाचा पहिला सामना १२ जून रोजी खेळला जाईल, ज्यामध्ये यजमान इंग्लंडचा सामना श्रीलंकेशी होईल. या विश्वचषकात एकूण १२ संघ सहभागी होणार असून, हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विश्वचषक असेल. गटांबाबत बोलायचे झाले, तर आयसीसीने दोन गट तयार केले आहेत. गट १ मध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, भारत आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे. याशिवाय आणखी दोन संघांचा समावेश होईल, ज्याचा निर्णय नंतर होईल.
अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचणार –
Mark your calendars 🗓
The fixtures for the ICC Women’s T20 World Cup 2026 are out 😍
Full details ➡ https://t.co/X2BqQphwSC pic.twitter.com/gqkxaMudEP
— ICC (@ICC) June 18, 2025
टी-२० विश्वचषकाच्या दुसऱ्या गटात यजमान इंग्लंडसह न्यूझीलंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडीज या संघांचा समावेश आहे. याशिवाय दोन संघ जागतिक पात्रता फेरीतून या गटात सामील होतील. नियमांनुसार, प्रत्येक संघ गटातील इतर सर्व संघांशी सामने खेळेल. त्यानंतर गुणतक्त्यात अव्वल दोन संघ थेट उपांत्य फेरीत पोहोचतील. उपांत्य फेरीचे सामने ३० जून आणि २ जुलै रोजी होणार आहेत, तर अंतिम सामना ५ जुलै रोजी लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवला जाईल.
हेही वाचा – Karun Nair : टी-२० लीगच्या पैशापेक्षा स्वप्न मोठं: करुण नायरने सांगितली मनाला भिडणारी कहाणी
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कधी होणार –
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याबद्दल बोलायचे, तर हा सामना १४ जून रोजी खेळला जाईल. भारत आणि पाकिस्तानचे संघ आता फक्त आयसीसी किंवा एसीसी स्पर्धांमध्येच एकमेकांसमोर येतात, त्यामुळे या सामन्याचा उत्साहही शिगेला पोहोचला आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत, त्यामुळे त्यांच्यातील सामना फक्त लीग टप्प्यातच शक्य होईल, भविष्यात सामना होण्याची शक्यता खूपच कमी आहे.





