Manipur : सहा दहशतवाद्यांना मणिपूरमध्ये अटक; दोन रायफल, नऊ मॅगझिन आणि ९९ काडतुसे जप्त
Updated On:

Manipur – मणिपूरच्या इंफाळ खोऱ्यातील तीन जिल्ह्यांमधून सुरक्षा दलांनी वेगवेगळ्या संघटनांशी संबंधित सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. यात बंदी घातलेल्या कांगलेईपाक कम्युनिस्ट पार्टी (पीडब्ल्यूजी) संघटनेच्या चार सक्रिय कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
या चौघांकडून दोन एसएलआर रायफल, दोन रायफल, नऊ मॅगझिन आणि ९९ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय प्रतिबंधित प्रेपाक (प्रो) आणि सोरेपा संघटनेच्या प्रत्येकी एका सक्रिय कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून एक बनावट बंदूक आणि तीन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.





