WTC Final 2025 : स्टीव्ह स्मिथने ९९ वर्षांचा विक्रम मोडत लॉर्ड्सवर रचला इतिहास, ब्रॅडमन-सोबर्सला टाकलं माग

WTC Final 2025 Steve Smith breaks Garry Sobers record at Lords : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ च्या फायनल सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आमनेसामने आहेत. दोन्ही संघांतील हा महत्त्वाचा सामना ऐतिहासिक लॉर्डस स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. दरम्यान स्टीव्ह स्मिथने या सामन्यात सर डॉन ब्रॅडमन आणि गॅरी सोबर्सचा विक्रम मोडला आहे. यासह क्रिकेटची पंझरी असलेल्या लॉर्ड्सवर स्मिथने ९९ वर्षांचा जुना विक्रम मोडून एक नवा इतिहास रचला.
स्टीव्ह स्मिथने लॉर्ड्सवर लिहिला नवा इतिहास –
स्टीव्ह स्मिथ लॉर्ड्सवर सर्वाधिक कसोटी धावा करणारा परदेशी फलंदाज बनला आहे. ५१ धावांची खेळी करताच त्याने ऑस्ट्रेलियाच्या वॉरेन बार्डस्लेचा मोठा विक्रम मोडला. बार्डस्ले याने १९०९ ते १९२६ दरम्यान लॉर्ड्सवर ५ कसोटी सामन्यांतील ७ डावांमध्ये २ शतके आणि २ अर्धशतकांसह ५७५ धावा केल्या होत्या. आता स्मिथच्या नावावर लॉर्ड्सवर ५९१ धावा आहेत, ज्यामध्ये त्याने २ शतके आणि ३ अर्धशतके झळकावली आहेत. या सामन्यात त्याने ६६ धावांची खेळी साकारली.
स्टीव्ह स्मिथने मोडला डॉन ब्रॅडमनचा विक्रम –
Big Match. Big Player. Steven Peter Devereux ⛳️#SteveSmith #AUSvsSA #SAvsAUS #WTC2025 #wtc2025final pic.twitter.com/wLv8mJOZ0O
— CREX (@Crex_live) June 11, 2025
डब्ल्यूटीसी फायनलच्या पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करताना स्मिथने महान डॉन ब्रॅडमन आणि वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू गॅरी सोबर्स यांनाही मागे टाकले. ब्रॅडमन यांनी लॉर्ड्सवर ४ टेस्ट सामन्यांतील ८ डावांमध्ये ५५१ धावा केल्या होत्या, तर सोबर्स यांनी ५ कसोटी सामन्यांतील ९ डावांमध्ये ५७१ धावा केल्या होत्या. आता स्मिथ लॉर्ड्सवर टेस्ट क्रिकेटमध्ये ६०० धावा करणारा जगातील पहिला फलंदाज होण्याच्या मार्गावर आहे.
हेही वाचा –ICC T20 Rankings : आयसीसी टी-२० क्रमवारीत उलटफेर; तिलक वर्माची बिनखेळता झेप, सूर्याची घसरण
लॉर्ड्सवर सर्वाधिक धावा करणारे टॉप ५ फलंदाज:
- १- स्टीव्ह स्मिथ- ५७८ धावा
- २- वॉरेन बार्डस्ली- ५७५ धावा
- ३- गॅरी सोबर्स- ५७१ धावा
- ४- डॉन ब्रॅडमन- ५५१ धावा
- ५- शिवनारायण चंद्रपॉल- ५१२ धावा
- ६- दिलीप वेंगसरकर- ५०८ धावा





