जातीचे दाखले नसल्याने धनगर समाज “वंचीत’

आमदार कुल; पाटस येथे दाखले वितरण मेळावा

वरवंड- धनगर समाज सतत भटकंती करणारा समाज आहे, त्यामुळे महसुली नोंदी अद्यापपर्यंत अस्तित्वातच नसल्याने तसेच जन्माच्या देखील नोंदी उपलब्ध होत नसल्याने आणि महत्त्वाचे म्हणजे शिक्षणाचा अभाव, अशा कारणांमुळे या समाजाला अद्यापपर्यंत जातीचे दाखले मिळालेले नाहीत. यामुळे हा समाज शासकीय योजनांपासून नेहमीच वंचीत राहिलेला आहे. याकरीता दाखले वितरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून समाजबांधवांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार राहुल कुल यांनी केले आहे.

दौंड तालुका राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने गुरुवारी (दि. 22) भाग्यसंकेत मंगल कार्यालयात धनगर समाज व तत्सम जातीचा दाखला वितरण व नोंदणी मेळावा आयोजित करण्यात आला आहे, याबाबत आमदार कुल यांनी माहिती दिली. मेळाव्याचे नियोजन राष्ट्रीय समाज पक्ष व दौंड तहसिल कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

या मेळाव्यास प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसिलदार बालाजी सोमवंशी, महाराष्ट्र राज्याचे मेंढी व शेळी विकास महामंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, रासपचे प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब केसकर, पुणे जिल्हाध्यक्ष हरिष खोमणे, दौंड तालुकाध्यक्ष तानाजी केकाण आदी उपस्थितीत होणार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)