Paris Paralympics 2024 : धावपटू सिमरन शर्माची कांस्यपदकाला गवसणी…

Paris Paralympics 2024 (Women’s 200 M T12 Final) : पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी कायम आहे. भारतीय पॅरा ॲथलीट सिमरन शर्माने महिलांच्या 200 मीटर टी12 (T12) स्पर्धेच्या अंतिम फेरीत 24.75 सेकंदात शर्यत पूर्ण करून कांस्यपदक जिंकण्यात यश मिळविले. सिमरनने वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली. पॅरिस पॅरालिम्पिकमधील भारताचे हे 28 वे पदक ठरले.
या स्पर्धेत क्युबाच्या ओमारा ड्युरंडने 23.62 सेकंदात शर्यत पूर्ण करून सुवर्णपदक जिंकले तर व्हेनेझुएलाच्या अलेजांद्रा पेरेझने 24.19 सेकंदात शर्यत पूर्ण करून रौप्यपदक जिंकले.
Medal No. 2⃣8⃣ for 🇮🇳🤩🥳#ParaAthletics: Women’s 200 M T12 Final👇
Simran Sharma clinches her first #Paralympic medal at #ParisParalympics2024, securing a #Bronze🥉with a personal best timing of 24.75 seconds.
Many congratulations, Simran!🥳
Keep chanting #Cheer4Bharat and… pic.twitter.com/909qzjRI1H
— SAI Media (@Media_SAI) September 7, 2024
पॅरालिम्पिकमधील टी-12 वर्गीकरण दृष्टिहीन खेळाडूंसाठी आहे. 6 सप्टेंबर रोजी झालेल्या या स्पर्धेत सिमरनने 25.03 सेकंदात शर्यत पूर्ण करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. सिमरनने याआधी 25.41 सेकंद वेळेसह उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.
दरम्यान, यावेळी भारताने पॅरालिम्पिकमध्ये आतापर्यंतची आपली सर्वोत्तम कामगिरी केली आहे, ज्यामध्ये एकूण 28 पदके जिंकण्यात यश मिळवले आहे. यात 6 सुवर्ण व्यतिरिक्त 9 रौप्य आणि 13 कांस्य पदकांचा समावेश आहे.





