CBSE Shooting C’ship 2024 : ओवी पवारची कांस्यपदकाला गवसणी

शिरूर : तिरुअनंतपुरम (केरळ) येथे २५ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर दरम्यान झालेल्या साऊथ झोन-२, सी. बी.एस.ई शूटिंग चॅम्पियनशिप २०२४-२५ मध्ये १० मी. पिप साईट एअर रायफल प्रकारात १४ वर्षे वयोगट मुलींमध्ये कु. ओवी निलेश पवार पोद्दार स्कूल, शिरूर हिने ४०० पैकी ३९० गुणांची कमाई करत कांस्यपदक मिळविले.
त्यामुळे तिची आगामी काळात भोपाळ (मध्य प्रदेश) येथे होणाऱ्या सी.बी.एस.ई नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ व तामिळनाडू अशा तब्बल ६ राज्यांतील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेसाठी निवड झालेली ओवी ही शिरूर मधील पहिलीच महीला नेमबाज बनली आहे.
शिरूरमधील युनिक शूटिंग क्लब मध्ये मा. शरद तरटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ती सराव करीत आहे. संदिप तरटे सर(आंतरराष्ट्रीय नेमबाज) तसेच पोद्दार इंटरनॅशनल स्कूल चे प्रिंसिपल निरज राय यांनी पुढील स्पर्धेसाठी ओवीचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.





