Pimpri : आंतरविद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत प्रणोती नंबरेला कांस्यपदक

कान्हे : सेंट्रल विद्यापीठ ऑफ हिमाचल प्रदेश धर्मशाळेच्या वतीने घेण्यात आलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेच्या महिला विभागात भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाची विद्यार्थिनी व आंदर मावळ भागातील पवळेवाडी येथील प्रणोती नांबरेने ७१ किलो वजन गटांत कांस्यपदक मिळविले.
या स्पर्धेत प्रणोती नांबरेने ७१ किलो वजन गटांत सहभागी होताना स्नॅच आणि क्लीन अँड जर्क मिळून एकूण १८३ किलो वजन उचलत ब्राँझपदक पटकावले. याआधी झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत प्रणोती नांबरेने सुवर्णपदक मिळविले होते.
पदक विजेत्या प्रणोती नांबरेचे भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठाचे कार्यवाह व भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाचे प्र-कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. अस्मिता जगताप, भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह डॉ. के. डी. जाधव,
कुलसचिव जी. जयकुमार, क्रीडा संचालक डॉ. नेताजी जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक रणखांबे तसेच मावळ तालुक्यातील वेटलिफ्टर मार्गदर्शक अनिकेत नवघणे यांनी अभिनंदन केले आहे. तर तिला मिळालेल्या या यशामुळे आई रोहिणी पांडुरंग नंबरे तसेच वडील पांडुरंग नंबरे कौतुक करत आहे





