ICC T20 Cricketer of The Year 2024 : साल 2024 हे वर्ष टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी खूप खास होते. टीम इंडियासाठीही हे विशेष होते, कारण भारताने दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले, ज्याचा अंतिम सामना 9 जून रोजी खेळला गेला. आता वर्ष संपण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) एक विशेष यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये पाकिस्तानचा बाबर आझम (Babar Azam), ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड (Travis Head) , झिम्बाब्वेचा सिकंदर रझा (Sikandar Raza) आणि भारताचा अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) यांचा समावेश आहे. या चार खेळाडूंची नावे आयसीसी पुरुष टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द इयरच्या विजेतेपदाच्या शर्यतीत समाविष्ट करण्यात आली आहेत, ज्यासाठी वोटिंग सुरू आहे. 1. बाबर आझम (पाकिस्तान) : पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने 2024 मध्ये 738 धावा केल्या आणि तो संघाचा सर्वात विश्वासार्ह फलंदाज ठरला. त्याने 24 सामन्यांत सहा अर्धशतके झळकावली. त्याने आयर्लंड दौऱ्यावर 75 धावांची खेळी केली, ज्यात त्याने 178.57 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या, ही या वर्षातील त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. 2. ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया) : ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडने 2024 मध्ये T20 क्रिकेटमध्ये आपले फलंदाजीचे कौशल्य दाखवले. त्याने 15 सामन्यात 178.47 च्या स्ट्राईक रेटने 539 धावा केल्या. ज्यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची इंग्लंडविरुद्धची 59 धावांची खेळी या वर्षातील सर्वात आक्रमक खेळी होती. 3. सिकंदर रझा (झिम्बाब्वे) : झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझाने आपल्या संघाला अनेक संस्मरणीय विजय मिळवून दिले. 2024 मध्ये, त्याने 146.54 च्या स्ट्राइक रेटने 573 धावा केल्या आणि 22.25 च्या गोलंदाजीच्या सरासरीने 24 बळी घेतले. गोलदांजीमध्ये 25 धावांत 3 बळी आणि उत्कृष्ट नेतृत्व याच्या जोरावर त्यानं भारताविरुद्ध संघाला 13 धावांनी आश्चर्यकारक विजय मिळवून दिला होता. वयाच्या 39 व्या वर्षीही रझाची कामगिरी त्याच्या खेळाप्रती असलेला अनुभव आणि समर्पण दर्शवते. Vijay Hazare Trophy 2024-25 : तब्बल 11 षटकार अन् 15 चौकार… मुंबईच्या 17 वर्षीय फलंदाजाने मोडीत काढला यशस्वी जैस्वालचा विश्वविक्रम… 4. अर्शदीप सिंग (भारत) : भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने 2024 मध्ये आपल्या शानदार गोलंदाजीने दिग्गज खेळाडूंना आणि क्रिकेटप्रेमींना प्रभावित केले. 2024 मध्ये त्याने 18 सामन्यात 13.5 च्या सरासरीने 36 विकेट घेतल्या. विशेषत: T20 विश्वचषक 2024 च्या फायनलमध्ये त्याच्या घातक गोलंदाजीने भारताला दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याची सर्वात संस्मरणीय खेळी 19व्या षटकात पाहायला मिळाली, जेव्हा त्याने केवळ चार धावा देऊन विरोधी संघावर दबाव आणला होता.