Speedboat Accident : सौरव गांगुलीचा भाऊ आणि वहिनी थोडक्यात बचावले! समुद्रात स्पीडबोट उलटल्याने अपघात

Snehasish Ganguly and Wife Survive Speedboat Accident in Puri : भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा मोठा भाऊ स्नेहाशिष गांगुली आणि त्याची पत्नी अर्पिता दोघेही स्पीडबोट अपघातात थोडक्यात बचावले. पुरीच्या समुद्रात वॉटर स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटीचा आनंद घेत असताना त्यांची स्पीडबोट उलटली. या अपघातानंतर दोघेही सुरक्षित आहेत. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. शनिवारी संध्याकाळी दीपगृहाजवळ ही घटना घडली, जेव्हा हे जोडपे स्पीडबोटवरून प्रवासाचा आनंद घेत होते.
अर्पिता गांगुली यांचे अपघाताबाबत गंभीर आरोप –
पुरीच्या समुद्रकिनाऱ्यावर वॉटर स्पोर्ट्स दरम्यान हा अपघात झाला. समुद्रात स्पीडबोट उलटल्याने हा अपघात झाला. ज्याचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये स्पीडबोट समुद्रात उलटी पडलेली दिसत आहे. जीवरक्षक सर्व पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यानंतर सौरव गांगुलीच्या भावाची पत्नी अर्पिता गांगुली यांनी या अपघाताबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, बोट तिच्या निर्धारित क्षमतेपेक्षा खूपच कमी वजनाचे प्रवासी वाहून नेत होती, त्यामुळे ती असंतुलित झाली आणि उलटली.
Sourav Ganguly’s Brother and Sister-in-Law Rescued After Speedboat Capsizes Off Puri Coast
A speedboat carrying tourists capsized in the deep sea off the coast of Puri on Saturday evening, leaving four people struggling to stay afloat. Fortunately, all four were rescued safely.… pic.twitter.com/ZX0Ie6wFpJ
— Kamalika Sengupta (@KamalikaSengupt) May 26, 2025
VIDEO | Puri, Odisha: Cricket Association of Bengal (CAB) President and brother of former Indian cricket team captain Sourav Ganguly, Snehasish Ganguly, and his wife Arpita Ganguly were safely rescued after they encountered a horror as their speedboat capsized off Puri coast.… pic.twitter.com/rWCOB4bgYm
— Press Trust of India (@PTI_News) May 26, 2025
समुद्रात जाणारी ती शेवटची बोट होती –
अर्पिता यांनी सांगितले की, “समुद्रात आधीच खूप मोठ्या लाटा येत होत्या आणि आम्ही ज्या बोटीत बसलो होतो, त्यात जास्तीत जास्त १० लोक बसू शकत होते. पण पैशाच्या लोभामुळे ते फक्त ३-४ लोक बसत होते. त्या दिवशी समुद्रात जाणारी ती शेवटची बोट होती. आधीच काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या, म्हणून मी विचारले की अशा स्थितीत जाणे योग्य आहे का? पण तो बोटवाला म्हणाला, ‘नाही, काहीही होणार नाही.’
हेही वाचा – LSG vs RCB : झहीर खानच्या मुलाच्या फोटोवरील विराटच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष; म्हणाला, ‘त्याचे डोळे तर…’
हे सर्व पैशाच्या लोभामुळे घडले –
अर्पिता पुढे म्हणाल्या, “हे सर्व पैशाच्या लोभामुळे घडले. सरांनी (सौरव गांगुलीचा भाऊ) देखील नकार दिला होता, पण तरीही त्यांनी आम्हाला नेले. देवाच्या कृपेने आम्ही वाचलो. मी अजूनही त्या धक्क्यात आहे. अशा घटना घडू नये आणि समुद्रात वॉटर स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटी योग्यरित्या आयोजित केल्या पाहिजेत. कोलकाता परतल्यानंतर मी पुरीचे पोलिस अधीक्षक आणि ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीन.’ या घटनेबद्दल त्यांनी सांगितले की, मोठ्या लाटेमुळे त्यांची बोट उलटली आणि त्या आणि त्यांच्या पतीसह सर्व प्रवासी समुद्रात पडले.

