सिद्धार्थ-जान्हवीची ‘परम सुंदरी’ सज्ज; नव्या डेटसह मोशन पोस्टरने वाढवली उत्सुकता

Param Sundari Release Date : सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांची आगामी प्रेमकहाणीवर आधारित फिल्म ‘परम सुंदरी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या नव्या रिलीज डेटची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, आता हा चित्रपट २९ ऑगस्ट २०२५ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
हा चित्रपट दिनेश विजान यांच्या मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली तयार करण्यात आला आहे. सुरुवातीला ‘परम सुंदरी’ २५ जुलैला प्रदर्शित होणार होता, मात्र आता ती तारीख बदलण्यात आली आहे. यासोबतच चित्रपटाचा एक खास मोशन पोस्टर देखील रिलीज करण्यात आला आहे, ज्यामध्ये सिद्धार्थ आणि जान्हवी यांची झलक पाहायला मिळते.
स्टारकास्ट आणि पार्श्वभूमी:
‘परम सुंदरी’ ही सध्या बॉलीवूडमध्ये जोरात असलेल्या लव्हस्टोरी फिल्म्सच्या लाटेतील एक महत्त्वाची फिल्म ठरू शकते. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या अहान पांडे आणि अनीत पड्डा यांच्या ‘सैयारा’ने प्रेमकथांवर आधारित सिनेमांना नवसंजीवनी दिली आहे.
पुढील काही आठवड्यांमध्ये ‘धडक २’ देखील प्रदर्शित होणार असून त्यामध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांच्या जोडीला पाहायला मिळणार आहे. यानंतर महिन्याच्या अखेरीस सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांची ‘परम सुंदरी’ ही फिल्म प्रदर्शित होणार आहे.
प्रेमकथांच्या चाहत्यांसाठी ही एक खास पर्वणी ठरणार आहे.





