ऑक्टोबर महिन्यात धमाका.! OTT आणि रुपेरी पडद्यावर एकापेक्षा एक भन्नाट सिनेमांची मेजवानी, पाहा यादी….

Releases this week : ऑक्टोबर महिना सिनेप्रेमींसाठी सरप्राइझने भरलेला ठरणार आहे. बॉलीवूडपासून ते साऊथ सिनेमापर्यंत विविध प्रकारच्या चित्रपटांचा आणि वेगवेगळ्या शैलींचा आनंद प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर तसेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर घेता येणार आहे.
मात्र, एवढंच नाही! या आठवड्यात आणखी काही रोमांचक चित्रपट आणि सिरीज तुमच्या स्क्रीनवर येण्यासाठी सज्ज आहेत. ‘दे कॉल हिम ओजी’, ‘परम सुंदरी’, ‘नोबडी वॉन्ट्स धिस 2’ यांसारख्या बहुप्रतीक्षित प्रोजेक्ट्स नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ आणि ZEE5 वर रिलीज होणार आहेत. चला पाहूया, ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यात काय-काय खास आहे!
1. परम सुंदरी (Param Sundari)
सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेली ही रोमँटिक ड्रामा फिल्म २४ ऑक्टोबर २०२५ रोजी प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन तुषार जलोटा यांनी केलं असून निर्मिती दिनेश विजान यांनी मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली केली आहे. प्रेक्षकांना या चित्रपटात एक ताजं प्रेमकथानक आणि सुंदर संगीत अनुभवायला मिळणार आहे.
2. कुरुक्षेत्र: पार्ट 2 (Kurukshetra: Part 2)
नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय मायथॉलॉजिकल ड्रामा सिरीज ‘कुरुक्षेत्र’चा दुसरा भाग २४ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
ही अॅनिमेटेड सिरीज अनु सिक्का यांनी तयार केली असून, पहिल्या भागाला IMDb वर ८.६ रेटिंग मिळाले आहे. पहिल्या सीझनमध्ये ९ भाग होते आणि दुसरा सीझन आणखी रोचक कथा घेऊन येणार आहे.
3. दे कॉल हिम ओजी (They Call Him OG)
तेलुगू सुपरस्टार पवन कल्याण यांचा अॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘दे कॉल हिम ओजी’ २३ ऑक्टोबर २०२५ रोजी नेटफ्लिक्सवर ओटीटी डेब्यू करणार आहे. हा चित्रपट सुजीत यांनी दिग्दर्शित केला असून, या माध्यमातून इमरान हाश्मी यांचा तेलुगू सिनेमात डेब्यू होत आहे. हा चित्रपट तेलुगू व्यतिरिक्त हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये देखील स्ट्रीम होणार आहे.
4. मारीगल्लू (Maarigallu)
कन्नड थ्रिलर फिल्म ‘मारीगल्लू’ ही देवराज पुजारी यांनी लिहून आणि दिग्दर्शित केली आहे. या चित्रपटात प्रवीण तेजस, निनाद हरित्सा आणि इतर कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. रहस्यमय कथानक आणि दमदार अभिनयामुळे हा चित्रपट चर्चेत आहे. प्रेक्षक ३१ ऑक्टोबर २०२५ पासून ZEE5 वर या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतील.
5. नोबडी वॉन्ट्स धिस सीझन 2 (Nobody Wants This Season 2)
नेटफ्लिक्सवरील रोमँटिक कॉमेडी शो ‘नोबडी वॉन्ट्स धिस’चा दुसरा सीझन २३ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
एरिन फोस्टर यांच्या निर्मितीतील या सिरीजमध्ये क्रिस्टन बेल, अॅडम ब्रॉडी, जस्टिन लूप, टिमोथी सिमन्स आणि इतर कलाकार झळकणार आहेत. या सीझनमध्ये आणखी विनोद, प्रेम आणि ड्रामाचा मसाला असेल.





