Virat Kohli : विराटला अवनीत कौरचा बोल्ड फोटो लाईक करणं पडलं महागात, द्यावं लागलं स्पष्टीकरण

Virat Kohli Clarifies Instagram Like Controversy : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) चा स्टार फलंदाज विराट कोहली एका छोट्या इन्स्टाग्राम लाईकमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. खरंतर, अनुष्का शर्माचा वाढदिवस १ मे रोजी होता आणि त्याच दिवशी विराटच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अभिनेत्री अवनीत कौरचा बोल्ड फोटो लाईक करण्यात आला होता. या प्रकरणावरून सोशल मीडियावर गदारोळ झाला आणि अनेकांनी विराटला ट्रोल करायला सुरुवात केली होती. ज्यामुळे विराट कोहलीला स्पष्टीकरण द्यावे लागले.
विराट कोहलीला द्यावे लागले स्पष्टीकरण –
अवनीत कौरने ३० एप्रिल रोजी तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन काही बोल्ड फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये ती हिरव्या रंगाचा टॉप आणि शॉर्ट स्कर्ट घातलेली दिसत होती. तिच्या फोटोंवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला होता, पण एका लाईकने सर्वांचे लक्ष वेधलं, ते लाईक विराट कोहलीचं होतं. यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. ज्यावर विराट कोहलीला स्पष्टीकरण द्यावं लागलं.
View this post on Instagram
विराट कोहली काय म्हणाला?
Star Indian Batter Virat Kohli issues statement after wild speculations on 'mistaken' Instagram activity #ViratKohli #RCB #IPL2025 pic.twitter.com/f205s628sv
— SportsTiger (@The_SportsTiger) May 2, 2025
अनुष्का शर्माच्या वाढदिवशी हे सर्व घडल्याचे लोकांना कळताच गोंधळ आणखी वाढला. यानंतर विराट कोहलीनेही त्या फोटोवरुन लाईक काढून टाकले, पण तोपर्यंत हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर ट्रोलिंग वाढू लागल्याने, विराट कोहलीला स्वतः पुढे येऊन स्पष्टीकरण द्यावे लागले. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिले की, “मी हे स्पष्ट करू इच्छितो की माझे फीड साफ करताना अल्गोरिदमने चुकून तो फोटो लाईक केला होता. त्यामागे कोणताही हेतू नव्हता. मी विनंती करतो की कोणतेही अनावश्यक गृहीतके बांधू नका.”
हेही वाचा – GT vs SRH : साई सुदर्शनने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये केला ‘हा’ खास पराक्रम
विराट आणि अनुष्का यांची गणना सुंदर जोडप्यांमध्ये केली जाते. दोघांनीही नेहमीच त्यांच्या केमिस्ट्रीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. सोशल मीडियावर या जोडप्याला खूप प्रेम मिळते. अशा परिस्थितीत जेव्हा विराटचे नाव दुसऱ्या अभिनेत्रीशी जोडले गेले, तेव्हा चाहते आश्चर्यचकित झाले आणि काहींनी नाराजीही व्यक्त केली. आता विराटच्या या स्पष्टीकरणानंतर हे प्रकरण हळूहळू शांत होईल अशी अपेक्षा आहे.





