Swastik Chikara Record : आयपीएल २०२६ पूर्वी आरसीबीची मोठी चूक? ज्या युवा खेळाडू रिलीज केलं, त्यानेच पाडला १९५ धावांचा पाऊस
Swastik Chikara Record : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) रिलीज केलेल्या स्वास्तिक चिकारा याने टी-२० क्रिकेटमध्ये वादळी खेळी करून निवडकर्त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

Swastik Chikara Record 195 runs Ayodhya Premier League 2026 : आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावात स्वास्तिक चिकारा याच्यावर एकाही फ्रँचायझीने बोली लावली नव्हती. गेल्या हंगामात आरसीबीच्या ताफ्यात असूनही त्याला एकही सामना खेळायला मिळाला नव्हता. मात्र, या अपमानाचा बदला स्वास्तिकने ‘अयोध्या प्रीमियर लीग’ मध्ये घेतला आहे. गोमती थंडरकडून खेळताना त्याने हिंडन टायटन्सविरुद्ध ऐतिहासिक खेळी साकारली.
केवळ ६९ चेंडूत ठोकल्या १९५ धावा!
स्वास्तिक चिकाराने सलामीला येत सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. त्याने केवळ ६९ चेंडूंमध्ये १९५ धावांची विष्फोटक खेळी केली. या खेळीत त्याने ११ चौकार आणि तब्बल २१ उत्तुंग षटकार ठोकले. २८२.६ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत त्याने मैदानाच्या चारी बाजूंना फटकेबाजी केली. टी-२० फॉरमॅटमध्ये द्विशतकाच्या उंबरठ्यावर पोहोचलेला तो मोजक्या फलंदाजांपैकी एक ठरला आहे.
३०७ धावांची विक्रमी भागीदारी –
A carnage from Swastik Chikara! 🔥🥶
He smashes an unbeaten 195 off 69 deliveries, including 11 fours and 21 sixes in the Ayodhya T20 Premier League! 💥🏏#SwastikChikara #T20s #Cricket #Sportskeeda pic.twitter.com/eAyGDpk4Ga
— Sportskeeda (@Sportskeeda) March 22, 2026
स्वास्तिक चिकारा आणि प्रियांशु पांडे या जोडीने हिंडन टायटन्सच्या गोलंदाजांची अक्षरशः पळता भुई थोडी केली. या दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ३०७ धावांची विक्रमी भागीदारी केली. स्वास्तिकच्या या खेळीच्या जोरावर गोमती थंडरने २० षटकांत ३०८ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात हिंडन टायटन्सचा संघ केवळ १८० धावांपर्यंत मजल मारू शकला आणि गोमती थंडरने हा सामना एकतर्फी जिंकला.
आयपीएल २०२७ साठी दावा केला मजबूत –
यूपी टी-२० लीगमध्ये अपयशी ठरल्याने स्वास्तिकला आयपीएल २०२६ च्या लिलावात कुणीही खरेदी केले नव्हते. मात्र, अयोध्येतील या वादळी खेळीनंतर अनेक आयपीएल फ्रँचायझींच्या नजरा पुन्हा एकदा या युवा खेळाडूवर खिळल्या आहेत. आपल्या या फॉर्मच्या जोरावर स्वास्तिक आता आयपीएल २०२७ मध्ये दमदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे.





