DC vs GT : शेवटच्या चेंडूवर गुजरातचा थरारक विजय! किलर-मिलरची ‘ती’ चूक दिल्लीला पडली महागात; हातातला सामना गमावला
DC vs GT : दिल्लीच्या मैदानावर प्रेक्षकांना श्वास रोखून धरायला लावणारा सामना पाहायला मिळाला, ज्यामध्ये गुजरातने बाजी मारली.

DC vs GT Gujarat Titans thrilling win : आयपीएल २०२६ च्या १४ व्या सामन्यात गुजरात टायटन्स (GT) संघाने थरारक विजय मिळवत हंगामातील आपले विजयाचे खाते उघडले आहे. सलग दोन पराभवानंतर दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने दिल्ली कॅपिटल्सचा (DC) अवघ्या १ धावेने पराभव केला.
दिल्लीच्या मैदानावर प्रेक्षकांना श्वास रोखून धरायला लावणारा सामना पाहायला मिळाला. प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने ४ बाद २१० धावांचा डोंगर उभा केला होता. विजयासाठी २११ धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा संघाला २० षटकांत ७ बाद २०९ धावांपर्यंतच मजल मारू शकला. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी २ धावांची गरज असताना डेव्हिड मिलरला फटका मारता आला नाही आणि गुजरातने विजयावर शिक्कामोर्तब केला.
Watch it yourself to believe it 🤯
A nerve-wrecking finish to a #TATAIPL classic 🥶 @gujarat_titans fans, you can breathe now 😅
Updates ▶️ https://t.co/oOdPR1oSeP#TATAIPL | #KhelBindaas | #DCvGT pic.twitter.com/Wh5EQvshqd
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2026
बटलर, गिल आणि सुंदरचा तडाखा
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरातची सुरुवात संमिश्र झाली. साई सुदर्शन (१२) स्वस्त परतल्यानंतर जोस बटलर (५२) आणि शुबमन गिल (७०) यांनी दिल्लीच्या गोलंदाजांची पिसं काढली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ३२ चेंडूत ६० धावा जोडल्या. बटलर बाद झाल्यावर गिलने वॉशिंग्टन सुंदर (५५) सोबत १०४ धावांची शतकीय भागीदारी केली. या त्रिकुटाच्या अर्धशतकांमुळे गुजरातने २१० धावांचा टप्पा ओलांडला.
It’s going down to the wire, folks 🥶#DC need 13 runs from the last over ‼️
Who is taking the 2⃣ points? 🤔
Updates ▶️ https://t.co/oOdPR1oSeP#TATAIPL | #KhelBindaas | #DCvGT pic.twitter.com/NPzhokr9t2
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2026
केएल राहुलचे हुकले शतक –
Stand up and Applaud 👏👏
KL Rahul making merry in New Delhi 🔥
Will he guide #DC over the line? 🤔
Updates ▶️ https://t.co/oOdPR1oSeP#TATAIPL | #KhelBindaas | #DCvGT | @klrahul | @DelhiCapitals pic.twitter.com/b8kCJNKcK9
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2026
लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीला केएल राहुल आणि पाथुम निसांका यांनी ६३ धावांची वेगवान सलामी दिली. केएल राहुलने आपल्या फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली, मात्र तो ९२ धावांवर बाद झाल्याने दिल्लीला मोठा धक्का बसला. मधल्या फळीत राशिद खानने नितीश राणा आणि समीर रिझवीला सलग दोन चेंडूवर बाद करून दिल्लीच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.
शेवटच्या ओव्हरचा थरार –
शेवटच्या १२ चेंडूत दिल्लीला ३६ धावांची गरज होती. १९ व्या षटकात मोहम्मद सिराजला डेव्हिड मिलर (४१)* आणि विप्राज निगम यांनी २३ धावा कुटल्या. शेवटच्या षटकात १३ धावा हव्या असताना प्रसिद्ध कृष्णाने विपराजला बाद केले. तिसऱ्या चेंडूवर सिंगल आणि चौथ्यावर षटकार बसल्याने सामना रंगतदार झाला. मात्र, शेवटच्या दोन चेंडूंवर मिलरला मोठे फटके मारता आले नाहीत आणि दिल्लीची विजयाची हॅट्ट्रिक हुकली.





