IND vs ENG : पराभवाच्या भीतीने ब्रूक गिलसमोर करू लागला गयावया, VIDEO होतोय व्हायरल

Shubman Gill and Harry Brook Video Viral : भारतीय संघ एजबॅस्टन कसोटीत इंग्लंडविरुद्ध वर्चस्व गाजवताना दिसत आहे. सामन्याचा चौथा दिवस संपला असून, भारताने आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध मोठी आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात भारतीय संघाने १८० धावांची आघाडी मिळवली. त्यानंतर इंग्लंडला विजयासाठी ६०८ धावांची गरज होती. चौथ्या दिवसाअखेर इंग्लंडने ३ गडी गमावून ७२ धावा केल्या आहेत. दरम्यान शुबमन गिल आणि हॅरी ब्रूकचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
भारतासाठी दोन्ही डावांमध्ये कर्णधार शुबमन गिलने अप्रतिम शतकी खेळी केली. पहिल्या डावात गिलने २६९ धावा केल्या, तर दुसऱ्या डावात १६१ धावांवर बाद झाला. एकूणच, एजबॅस्टन कसोटीत इंग्लंडचे खेळाडू गिलला बाद करण्यासाठी अस्वस्थ दिसले. याच दरम्यान, कर्णधार शुबमन गिल आणि इंग्लंडचा खेळाडू हॅरी ब्रूक यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गिल-ब्रूकच्या संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल –
Fancy a declaration, skipper? 😏 #HarryBrook‘s playful banter with #ShubmanGill had everyone in splits —
Trying to charm the Indian captain into a cheeky call? 😂#ENGvIND 👉 2nd TEST, Day 4 | LIVE NOW on JioHotstar ➡ https://t.co/2wT1UwEcdi pic.twitter.com/xTJJYhAGRk— Star Sports (@StarSportsIndia) July 5, 2025
हा प्रसंग भारतीय संघाच्या फलंदाजीदरम्यानचा आहे. गिल फलंदाजी करत असताना ब्रूकसह इंग्लंडचे खेळाडू डाव घोषित करण्यासाठी विनवणी करताना दिसले. व्हायरल व्हिडीओत हॅरी ब्रूक कर्णधार गिलला डाव घोषित करण्याची विनंती करताना दिसत आहे.
हेही वाचा – IND vs ENG : शुबमन गिलचा ऐतिहासिक धमाका! ‘हा’ पराक्रम करणारा भारताचा पहिला आणि जगातील दुसरा फलंदाज ठरला
गिल आणि ब्रूकमध्ये काय झालं संभाषण?
इंग्लंडचा खेळाडू हॅरी ब्रूक शुबमन गिलला म्हणाला, “४५० धावांची आघाडी मिळाली आहे, आता तरी डाव घोषित करा. उद्या अर्धा दिवस पाऊस पडणार आहे.” यावर गिल म्हणाला, “आमचं दुर्दैवच!” त्यानंतर ब्रूक पुन्हा म्हणाला, “मग ड्रॉसाठी तयार राहा.” ब्रूकच्या या वक्तव्यानंतर गिल काहीच बोलला नाही. त्याने आपल्या बॅटने उत्तर दिलं. शुबमन गिलने दुसऱ्या डावात विक्रमी शतक झळकावलं आणि संघाची धावसंख्या इंग्लंडच्या अपेक्षेपलीकडे नेली. यासह त्याने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले.
हेही वाचा – IND vs ENG : शुबमन गिलचा सलग दुसऱ्या शतकासह ऐतिहासिक विक्रम; गावस्करांचा मोडला ५४ वर्षांचा रेकॉर्ड
गिल आणि ब्रूक यांच्यातील संभाषण स्टम्प माइकमध्ये रेकॉर्ड झाले आणि काही वेळातच ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. या सामन्यात भारतीय संघाने उत्कृष्ट फलंदाजी केली. भारताने पहिल्या डावात १५१ षटकं खेळली, तर दुसऱ्या डावातही ७५ पेक्षा जास्त षटके खेळली. यामुळे इंग्लंडचे खेळाडू मैदानावर खूप थकलेले दिसत होते. त्यानंतर दुसऱ्या डावात लगेच फलंदाजीला उतरल्यावर भारताच्या शानदार गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या संघाला झटपट विकेट्स गमवाव्या लागल्या.





