Shubman Gill : शुबमन गिल-सारा तेंडुलकर पुन्हा एकत्र? व्हायरल फोटोने चर्चांना उधाण

Shubman Gill and Sara Tendulkar Photo Viral : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. काही दिलसांपूर्वी दोघांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा होती. मात्र, आता दोघांचा एका कार्यक्रमाला एकत्र उपस्थित असल्याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामुळे दोघे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शुबमन आणि साराचा फोटो कधीचा आणि कुठल्या कार्यक्रमातील आहे? जाणून घेऊया.
कोणत्या कार्यक्रमाला दोघे होते उपस्थिती?
माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग याने ८ जुलै २०२५ रोजी लंडनमध्ये आपल्या यूव्हीकॅन फाउंडेशनसाठी एक चॅरिटी डिनर आयोजित केला होता. या कार्यक्रमाला क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. कर्करोग जागरूकता आणि उपचारांसाठी निधी गोळा करण्याच्या उद्देशाने आयोजित या डिनरला भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल आपल्या संपूर्ण संघासह आणि सारा तिच्या कुटुंबासह उपस्थित होती.
👀❤🔥
Photographer knows the demand of the moment 📈#ShubmanGill #SaraTendulkar pic.twitter.com/xCGtebxMd5
— ᴘʀɪʏᴀᴍ™⑦⑦ (@Priyamzzz_77) July 9, 2025
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला गिल-साराचा फोटो हा युवराज सिंगच्या कार्यक्रमातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये शुबमन गिल हा सारा तेंडुलकरच्या समोर जाताना तिच्याकडे पाहून हसताना दिसत आणि ती बसलेली आहे. या फोटोमुळे शुबमन आणि साराच्या कथित जवळीकीच्या अफवांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.
हेही वाचा – Bagracote Cricket Clash : क्रिकेट सामन्यात झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर झाले दंगलीत, VIDEO होतोय व्हायरल
कधीचा आहे फोटो?
Cricketer Shubman Gill, along with Gautam Gambhir, the entire Indian team, Virat Kohli 🐐, Sachin Tendulkar with Anjali ma’am, and Sara Tendulkar, attended the YWC fundraiser charity dinner yesterday. pic.twitter.com/jLDZ3YC5ys
— JassPreet (@JassPreet96) July 9, 2025
हा फोटो त्या वेळेचा असल्याचे सांगितले जात आहे, जेव्हा गिल आपल्या संघासह डिनरसाठी गेला होता आणि सारा तेंडुलकर तिथे आधीपासून उपस्थित होती. सारा तेंडुलकरने देखील तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर या इव्हेंटचा फोटो शेअर केला आहे, ज्यात ती तिच्या मैत्रिणींसोबत दिसत आहे.
युवराज सिंगने २०११ मध्ये कर्करोगाविरुद्धची आपली लढाई जिंकल्यानंतर यूव्हीकॅन फाउंडेशनची स्थापना केली होती. हे फाउंडेशन कर्करोगाबाबत जागरूकता वाढवणे, लवकर निदानाला प्रोत्साहन देणे आणि रुग्णांना आर्थिक मदत पुरवण्याचे काम करते. लंडनमधील या चॅरिटी डिनरचा उद्देश फाउंडेशनसाठी निधी गोळा करणे हा होता. मात्र, शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर यांचा एकत्र दिसलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हा कार्यक्रम विशेष चर्चेत आला.





