Bagracote Cricket Clash : क्रिकेट सामन्यात झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर झाले दंगलीत, VIDEO होतोय व्हायरल

Bagracote Cricket Clash : पश्चिम-बंगालमधील सिलीगुडीच्या बगराकोट परिसरात एका छोट्याशा क्रिकेट सामन्यातील वाद विकोपाला गेला आणि बुधवारी दोन समुदायांमध्ये मोठ्या दंगलीत रुपांतर झाले. सुरुवातीला किरकोळ वाटणारा हा वाद काही वेळातच हिंसक बनला. या हिंसाचारात वाहनांना आग लावण्यात आली, तसेच अनेक दुकाने आणि घरांची तोडफोड झाली. ज्यामुळे परिसरात एकदम गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.
स्थानिक अहवालांनुसार, बगराकोट येथे सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यादरम्यान एका निर्णयावरून दोन समुदायांमध्ये वाद सुरू झाला. सुरुवातीला हा वाद किरकोळ वाटत होता, पण लवकरच याचे रूपांतर शिवीगाळ आणि मारहाणीत झाले. काही लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली.
दोन्ही गटांकडून मोठ्या प्रमाणात तोडफोड –
#WATCH | West Bengal: Local people pelt stones on Police and security personnel deployed in Siliguri’s Bagracote area following a clash between two groups here. The security personnel are trying to bring the situation under control. pic.twitter.com/RlmiRZJ6VX
— ANI (@ANI) July 9, 2025
काही वेळातच दोन्ही गटांचे लोक जमले आणि दगडफेक सुरू झाली. काहींनी दुकाने आणि वाहनांची तोडफोड सुरू केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, जमाव कसा हिंसक बनला. दगडांचा मारा सुरू असताना पोलिसांनाही स्वतःचा बचाव करावा लागला. सर्वत्र आगजनी आणि गोंधळाचे वातावरण होते.
घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा तैनात –
घटनेसंदर्भात माहिती मिळताच स्थानिक पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. परंतु परिस्थिती इतकी बिकट होती की पोलिसांना स्वतःचा बचाव करावा लागला. हिंसक जमावाने पोलिसांवरही दगडफेक सुरू केली, ज्यामुळे पोलिसांना मागे हटावे लागले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार आणि अश्रुधुराचा वापर करावा लागला. घटनेनंतर बगराकोट परिसरात मोठ्या संख्येने पोलिस आणि सुरक्षा यंत्रणां तैनात करण्यात आली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले जात आहे, परंतु वातावरण तणावपूर्ण आहे. लोकांमध्ये भीती आणि संताप दिसून येत आहे.
हेही वाचा – Yash Dayal : ‘तिने आयफोन आणि लॅपटॉप चोरला अन्…’, गर्लफ्रेंडच्या आरोपांवर यश दयालचा धक्कादायक खुलासा!
स्थानिकांचे काय आहे म्हणणे?
स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की सिलीगुडी हे नेहमीच शांत शहर राहिले आहे. येथे वेगवेगळ्या समुदायांचे लोक वर्षानुवर्षे सुखाने राहत आले आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या सांप्रदायिक हिंसाचाराने सर्वांना धक्का बसला आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की क्रिकेट सामना हा केवळ एक निमित्त होते, खरे कारण पूर्वीपासून असलेल्या तणावामुळे हा वाद उद्भवला.





