Shubman Gill : ‘मी तीन वर्षांपासून…’, शुबमन गिलचा लव्ह लाईफबद्दल मोठा खुलासा, पाहा VIDEO

Shubman Gill denies dating rumors : टीम इंडियाचा स्टार फलंदाज शुबमन गिल क्रिकेटसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. आजकाल, त्याच्या लव्ह लाईफबद्दलची चर्चा पुन्हा एकदा तीव्र झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गिलचे नाव माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरशी जोडले जात आहे. जरी दोघांनीही यावर कधीही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आता दोघांनीही एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. त्यानंतर ब्रेकअपच्या बातम्या येऊ लागल्या. या सगळ्यामध्ये शुबमन गिलने त्याच्या लव्ह लाईफबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.
शुबमन गिलचा लव्ह लाईफवर मोठा खुलासा –
सारा तेंडुलकर व्यतिरिक्त शुबमन गिलचे नाव रिद्धिमा पंडित, अनन्या पांडे, सोनम बाजवा आणि अवनीत कौरसह अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. मात्र, गिलने आता या मुद्द्यावर आपले मौन सोडले आहे. त्याच्या लव्ह लाईफबद्दल बोलताना गिलने द हॉलिवूड रिपोर्टर इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मी गेल्या ३ वर्षांहून अधिक काळ सिंगल आहे, मला वेगवेगळ्या लोकांशी जोडण्याच्या अनेक अटकळ आणि अफवा आहेत. कधीकधी ते इतके कुरूप असते की, ज्या व्यक्तीशी माझे नाव जोडले जात असते. त्या व्यक्तीला मी कधीही पाहिलेले किंवा भेटलेलो नसतो. सध्या माझे लक्ष माझ्या व्यावसायिक कारकिर्दीवर आहे.”
Shubman Gill has finally said it about his dating rumours with sara tendulkar. pic.twitter.com/GrThDLxCoR
— mufaddla parody (@mufaddl_parody) April 26, 2025
शुबमन गिलने या विधानाने सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे आणि तो सध्या सिंगल असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु, काही काळापूर्वी अशीही बातमी आली होती की शुबमन आता अवनीतला डेट करत आहे. अवनीत आणि शुबमन देखील त्यांच्या मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेताना दिसले होते. तिने शुबमनला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. एवढेच नाही तर अवनीत अनेक वेळा क्रिकेट सामन्यांमध्ये टीम इंडियाला पाठिंबा देताना दिसली होती.
हेही वाचा – CSK vs SRH : सीएसकेच्या पराभवानंतर अभिनेत्री श्रुती हसनला अश्रू अनावर, VIDEO व्हायरल
शुबमन आयपीएल २०२५ मध्ये व्यस्त –
शुबमन गिल सध्या आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात संघ पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. त्याने ८ पैकी ६ सामने जिंकले आहेत आणि फक्त २ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याच वेळी, गिलने या सामन्यांमध्ये ४३.५७ च्या सरासरीने ३०५ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ३ अर्धशतकांचाही समावेश आहे. त्याने १५३.२६ च्या स्ट्राईक रेटने हे धावा केल्या आहेत आणि त्याच्या संघाला चांगली सुरुवात करुन दिली आहे.





