धानोरीत श्रीरामनवमी उत्साहात साजरी

विश्रांतवाडी : धानोरी येथील श्रीसाई प्रतिष्ठाण व माता जिजाऊ प्रतिष्ठानच्यावतीने श्रीरामनवमी व श्रीसाई जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त पालखी सोहळ्याबरोबरच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आनंदपार्क, भैरवनगर परिसरातून काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मार्गावर जागोजागी रांगोळी काढून पुष्पवृष्टी करून पालखीचे स्वागत केले.
यावेळी आमदार बापुसाहेब पठारे, प्रतिष्ठानचे संस्थापक माजी नगरसेवक अनिल (बॉबी) टिंगरे, माजी नगरसेविका ऐश्वर्या आशुतोष जाधव, विश्रांतवाडी पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक कांचन जाधव, पोलिस निरीक्षक मंगेश हांडे, पोलिस उपनिरीक्षक नितीन राठोड, महेश भोसले, गणेश पारडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष जगदीश देशपांडे, शैलेश रणनवरे, सुभाष पाटील, कैलास पठारे, बंटी म्हस्के, सागर म्हस्के, विशाल आगरवाल, शशिकांत भोसले, नितीन सुपले, पुजा धनंजय जाधव, संदीप पुरकर, विनोद पवार, जितेंद्र कराळेकर, संजय चव्हाण, सुरेश बर्गे यांसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीराम नवमीनिमित्त आनंदपार्क येथील साईबाबा मंदिरात करण्यात आलेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये श्री साई जन्मोत्सव, पालखी सोहळा, काकड आरती, अभिषेक, यज्ञ, होमहवन, महाआरती, महाप्रसाद, विविध स्थानिक भजनीं मंडळांचे भजन व किर्तनाच्या कार्यक्रमाचा समावेश होता. पंडीत हर्षवर्धन दळवी व त्यांच्या सहकाऱ्यांचे साईराम भजन आयोजित केले होते. यावेळी परिसरातील सुमारे 3 हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रतिष्ठानचे संजय मोरे, रामराव मोरे, पोपट धर्मे, सुधाकर नायक, योगेश निरभवने, अविनाश दिवेकर, विवेक पाटील, गुरु बिराजदार, संतोष कदम, प्रकाश सुतार यांसह परिसरातील दिव्यशक्ती मित्र मंडळ, जय भवानी मित्र मंडळ व लातुरकर ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.





