Shreyas Iyer : ‘…म्हणून श्रेयसला कॅप्टन्सी करायला आवडते’, टी-२० मुंबई लीगमध्ये केला स्वत:च खुलासा

Shreyas Iyer on Captaincy : गेल्या वर्षी केकेआरला आयपीएल विजेतेपद मिळवून देणाऱ्या आणि यंदा पंजाब किंग्जला अंतिम फेरीत नेणाऱ्या भारताचा स्टार क्रिकेटपटू श्रेयस अय्यरने सांगितले की, त्याला कर्णधारपद खूप आवडते. कारण यामुळे तो आपले सर्वोत्तम प्रदर्शन देऊ शकतो. अय्यरने पंजाब किंग्जला आयपीएल २०२५ च्या अंतिम फेरीत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत ६०४ धावा केल्या, परंतु इंग्लंडमधील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात त्याला स्थान मिळाले नाही.
कप्तानीमुळे परिपक्वता आणि जबाबदारी येते – श्रेयस अय्यर
श्रेयस अय्यरने सोबो मुंबई फाल्कन्सला टी-२० मुंबई लीगच्या सेमीफायनलमध्ये स्थान मिळवून दिल्यानंतर सांगितले, “कप्तानीमुळे खूप परिपक्वता आणि जबाबदारी येते. तुमच्याकडून नेहमीच उत्तम कामगिरीची अपेक्षा असते आणि तुम्ही संघासाठी सर्वोत्तम योगदान देऊ इच्छिता. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत किंवा अडचणीत संघ कर्णधाराकडेच येतो. मी वयाच्या २२व्या वर्षापासून कप्तानी करत आहे. मला यात खूप आनंद मिळतो.”
Back-to-back playoffs for Shreyas Iyer! 🔥
He led PBKS to the IPL 2025 Final and is now a part of SoBo Mumbai Falcons, who reached the playoffs in the inaugural Mumbai T20 League! 👏🏆#ShreyasIyer #PBKS #SoBoMumbaiFalcons #IPL2025 #Sportskeeda pic.twitter.com/xG4x2gSv7c
— Sportskeeda (@Sportskeeda) June 8, 2025
मी माझ्या झोनमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो –
Shreyas Iyer on T20 Mumbai League:
“Mumbai Cricket Association has put in great efforts to bring this league – identify the talents who have been consistently performing in the grassroots of Mumbai – gives them a great platform to come & express themselves – also to thrive… pic.twitter.com/vG2qY32NTX
— Johns. (@CricCrazyJohns) June 9, 2025
अय्यर म्हणाला की, दबावाच्या परिस्थितीला तो आव्हान म्हणून स्वीकारतो आणि आपले सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणाला, “मी माझ्या झोनमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. मी पूर्णपणे लक्ष केंद्रित ठेवण्याचा आणि वर्तमानात राहून परिस्थितीनुसार खेळण्याचा प्रयत्न करतो. मी स्वतःला सांगत राहतो की मला प्रेक्षकांच्या तोंडी माझे नाव यावे असे वाटते आणि यातून मला प्रेरणा मिळते.”
जुन्या ओळखीच्या खेळाडूंसोबत खेळण्याचा आनंद होतोय –
अय्यर म्हणाला की, या स्पर्धेत जुन्या ओळखीच्या खेळाडूंसोबत खेळताना आनंद होत आहे, जे त्याच्या बालपणीच्या क्रिकेट प्रवासात त्याच्यासोबत होते. तो म्हणाला, “ड्रेसिंग रूममध्ये अनेक परिचित चेहरे आहेत. मी क्लब क्रिकेट, शाळा आणि कॉलेजमध्ये त्यांच्यासोबत खेळलो आहे. आता इथे त्यांच्यासोबत पुन्हा खेळताना खूप छान वाटत आहे.”





