Shreyas Iyer Reaction : ‘मी आयुष्यात आंतरराष्ट्रीय लेव्हलवर अशी बॅटिंग पाहिली नाही!’ अभिषेक-वैभवचा तांडव पाहून श्रेयस अय्यरही थक्क
Shreyas Iyer Reaction : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी ज्या पद्धतीने फलंदाजी केली, ते पाहून कर्णधार श्रेयस अय्यर थक्क झाला.

Shreyas Iyer Reaction on Abhishek Sharma Vaibhav Sooryavanshi Batting : न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने ६ गडी राखून मिळवलेला ऐतिहासिक विजय संपूर्ण क्रिकेट जगताला चकित करणारा ठरला. १९९ धावांचे मोठे आव्हान भारतीय संघाने अवघ्या १३.२ षटकांत लीलया पार केले. या विजयाचा पाया रचणाऱ्या अभिषेक शर्मा (३८ चेंडूंत ११३ धावा) आणि वैभव सूर्यवंशी (१९ चेंडूंत ४५ धावा) यांच्या अद्भूत फटकेबाजीने भारतीय कर्णधार श्रेयस अय्यर यालाही थक्क केले. सामन्यानंतर बोलताना श्रेयसने उघडपणे कबूल केले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या संपूर्ण आयुष्यात अशी विध्वंसक फलंदाजी कधीही पाहिली नव्हती.
५ षटकांत १०० धावा; क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम प्रदर्शन –
सामन्यानंतरच्या सादरीकरणात बोलताना श्रेयस अय्यर म्हणाला, “खरे सांगायचे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर अवघ्या ५ षटकांत १०० धावा होताना मी माझ्या संपूर्ण कारकिर्दीत पाहिलेले नाही. माझ्या दृष्टीने हे टी-२० इतिहासातील अव्वल दर्जाचे फलंदाजी प्रदर्शन आहे.” वैभव आणि अभिषेकने पहिल्या विकेटसाठी अवघ्या ४३ चेंडूंत १३३ धावांची स्फोटक भागीदारी रचली. २३६ च्या स्ट्राईक रेटने खेळणाऱ्या वैभवच्या साथीने अभिषेकने २९७ च्या स्ट्राईक रेटने ९ चौकार आणि ११ षटकार खेचत न्यूझीलंडला अक्षरशः गुडघे टेकण्यास भाग पाडले.
‘आम्ही गेलो तेव्हा बॉल सीम होत होता, मग यांनी कसं मारलं?’
Shreyas Iyer said – “When I went out to bat it was seaming, Sanju and me were like, how did Abhishek & Vaibhav managed to score so much?, they way they played today was exceptional, it was amazing the way the lads pulled up to this occasion, mind boggling”. https://t.co/t6Idg2gruM
— Sportsnexa (@sportsnexa07) October 27, 2026
आपल्या फलंदाजीचा अनुभव सांगताना कर्णधाराने एक रंजक खुलासा केला. तो म्हणाला, “जेव्हा संजू सॅमसन आणि मी फलंदाजीला गेलो, तेव्हा चेंडू प्रचंड सीम आणि स्विंग होत होता. अशा अवघड परिस्थितीत वैभव आणि अभिषेकने इतके उत्तुंग षटकार आणि चौफेर चौकार कसे लगावले, याचाच विचार मी करत होतो. दोघांनी खेळलेले शॉट्स डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. परदेशी भूमीवर खेळताना वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागतो; तिथे जाऊन खेळाडूंनी स्वतःच्या नैसर्गिक शैलीत असे तुफान उडवून देणे खरोखर कौतुकास्पद आहे.”
यॉर्कर्सची मात्रा लागू पडली; न्यूझीलंडला २०० च्या आत रोखले
Shreyas Iyer left awestruck by Abhishek Sharma and Vaibhav Sooryavanshi’s powerplay blitz in 3rd T20I
Shreyas Iyer said:
“Absolutely stunning. It was pleasing to the eyes the way they played strokes. Also, when Sanju and I went to bat, the ball was seamless, and I was like, ‘How did they manage this?’ It was simply mind-boggling.”
— Cricket Hub (@Anurag9793) October 27, 2026
सामन्यातील गोलंदाजीच्या रणनीतीवर भाष्य करताना अय्यरने सांगितले की, न्यूझीलंडच्या डावात १० षटकांनंतर चेंडू हार्ड लेंथवर टाकला तरी फलंदाज थेट प्रेक्षकगॅलरीत भिरकावत होते. त्यामुळे गोलंदाजांना सलग सहाही चेंडू यॉर्कर फेकण्याचा स्पष्ट सल्ला देण्यात आला. या रणनीतीमुळे किवींची धावगती ८ ते ९ प्रति षटकावर मर्यादित ठेवण्यात यश आले आणि प्रतिस्पर्ध्यांना २०० च्या आत (१९८ धावांवर) रोखणे शक्य झाले.
दोन सामने बाकी असतानाच मालिका खिशात –
𝐀𝐔𝐃𝐀𝐂𝐈𝐎𝐔𝐒 is the word 😎
#TeamIndia | #NZvIND https://t.co/40wGEx66oK
— BCCI (@BCCI) October 27, 2026
पाच सामन्यांच्या मालिकेत अजून दोन सामने शिल्लक असतानाच भारताने ३-० अशी विजयी आणि अजेय आघाडी घेतली आहे. संपूर्ण संघाने दाखवलेल्या सांघिक एकजुटीचा अभिमान व्यक्त करत, खेळाडू आगामी सामन्यांमध्येही हाच आक्रमक आणि निर्भय फॉर्म कायम राखतील, असा विश्वास कर्णधार श्रेयस अय्यरने व्यक्त केला.





