India Beat NZ : किवी गोलंदाजांची पळता भुई थोडी! अभिषेकच्या शतकी वादळात १९९ चे लक्ष्य १३.२ षटकांत फस्त; भारताने साधली विजयाची हॅट्ट्रिक
India Beat NZ : भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत अभेद्य आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात १९९ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी भारताला केवळ १३.२ षटके लागली.

India Beat New Zealand by 6 Wickets in 3rd T20I Wellington : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने अविश्वसनीय विजयाची नोंद केली. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ३ बाद १९८ धावांची भक्कम धावसंख्या उभारली होती. मात्र, अभिषेक शर्मा आणि युवा वैभव सूर्यवंशी यांच्या स्फोटक सलामीच्या जोरावर भारताने हे १९९ धावांचे मोठे आव्हान अवघ्या १३.२ षटकांत ४ गडी गमावून पूर्ण केले. या ६ गडी राखून मिळवलेल्या दिमाखदार विजयासह भारताने मालिकेत ३-० अशी विजयी आणि अजेय आघाडी घेतली आहे.
पहिल्याच षटकात २६ धावा; पॉवरप्लेमध्येच ११८ धावांचा पाऊस –
आज टीम मॅनेजमेंटने संजू सॅमसनऐवजी डावाची सुरुवात करण्यासाठी अभिषेकसोबत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला मैदानात उतरवले. पहिल्याच षटकात या जोडीने २६ धावा चोपून आक्रमक सुरुवात केली. पाचव्या षटकात भारताने शतकी टप्पा ओलांडला, तर पॉवरप्लेच्या पहिल्या ६ षटकांत तब्बल ११८ धावा कुटल्या. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या ४३ चेंडूंत १३३ धावांची वादळी भागीदारी रचली. वैभवने अवघ्या १९ चेंडूंत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ४५ धावांची तुफानी खेळी केली.
अभिषेकचे ३५ चेंडूंत शतक; रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी –
1️⃣9️⃣9️⃣ chased down in 13.2 overs 💥
📸 #TeamIndia take a 3️⃣-0️⃣ lead and seal the series with a run-chase for the ages 👏 🙌
Updates ▶️ https://t.co/zf4CnZQ8CD
#NZvIND https://t.co/pP6zHBmuns
— BCCI (@BCCI) October 27, 2026
भारताचा सलामीवीर अभिषेक शर्माने मैदानात चौफेर फटकेबाजी करत अवघ्या १५ चेंडूंत अर्धशतक आणि ३५ चेंडूंत शतक पूर्ण केले. त्याने ३८ चेंडूंत ९ चौकार आणि ११ उत्तुंग षटकारांच्या मदतीने ११३ धावांची ऐतिहासिक खेळी साकारली; म्हणजेच १०२ धावा त्याने केवळ चौकार-षटकारांमधून काढल्या. भारताकडून हे आंतरराष्ट्रीय टी-२० मधील संयुक्तपणे दुसरे सर्वात जलद शतक ठरले असून त्याने रोहित शर्माच्या ३५ चेंडूंतील शतकाची बरोबरी केली.
नमन धीरचा विजयी चौकार; १४ व्या षटकातच खेळ खल्लास –
1⃣1⃣3⃣ runs
3⃣8⃣ balls
2⃣9⃣7⃣.3⃣7⃣ strike rate
9⃣ fours & 1⃣1⃣ sixesAbhishek Sharma, take a bow for that astonishing innings 🙇♂️
Updates ▶️ https://t.co/zf4CnZQ8CD
#TeamIndia | #NZvIND https://t.co/RxygJwIOUw
— BCCI (@BCCI) October 27, 2026
१० व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर अभिषेक १७८ च्या धावसंख्येवर बाद झाल्यानंतर भारताची धावगती किंचित मंदावली. संजू सॅमसनने १३ चेंडूंत १८ आणि कर्णधार श्रेयस अय्यरने १० चेंडूंत ५ धावा केल्या. अखेर नमन धीरने शानदार विजयी चौकार ठोकत अवघ्या १३.२ षटकांत भारताचा विजय साकार केला आणि न्यूझीलंडच्या आव्हानातील हवा काढून घेतली.
डॅरिल मिचेलचे नाबाद ८९ धावांची खेळी ठरला व्यर्थ –
Innings Break!
#TeamIndia bowlers have done a fine job towards the backend of the innings to restrict the New Zealand total to 198/3.
Chase coming up shortly. Stay tuned.
Scorecard – https://t.co/zf4CnZQ8CD #NZvIND https://t.co/kP0vl3QVO6
— BCCI (@BCCI) October 27, 2026
तत्पूर्वी, न्यूझीलंडकडून टिम सेफर्ट (२) स्वस्तात बाद झाल्यानंतर फिन ॲलनने २५ चेंडूंत ४० धावा केल्या. त्यानंतर डॅरिल मिचेलने ५२ चेंडूंत ५ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ८९ धावांची खेळी केली, तर बेवन जॅकब्सने २३ चेंडूंत नाबाद ३९ धावा जोडत संघाला १९८ धावांपर्यंत पोहोचवले. भारतीय गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार ४ षटकांत ४० धावा देऊन पुन्हा निष्प्रभ ठरला; तर अर्शदीप सिंग, अक्षर पटेल आणि नितीश कुमार रेड्डी यांनी प्रत्येकी १ विकेट्स घेतली.





