Abhishek Sharma Records : अभिषेक शर्माने वेलिंग्टनमध्ये केला कहर! वादळी शतक ठोकत किंग कोहलीला मागे टाकत रचले तब्बल ६ रेकॉर्ड्स
Abhishek Sharma Records : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या टी२० सामन्यात अभिषेक शर्माने धुमाकूळ घातला. स्टार सलामीवीर अभिषेकने वेलिंग्टनमध्ये शतक झळकावत तब्बल ६ विक्रम प्रस्थापित केले.

Abhishek Sharma Smashes 6 Big Records With 4th T20I Century vs New Zealand in Wellington : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने ६ गडी राखून मिळवलेला विजय ऐतिहासिक ठरला. १९९ धावांचे मोठे लक्ष्य भारतीय संघाने अवघ्या १३.२ षटकांत पूर्ण केले. या विजयाचा महानायक ठरलेल्या २६ वर्षीय अभिषेक शर्मा याने ३८ चेंडूंत ९ चौकार आणि ११ उत्तुंग षटकारांसह ११३ धावांची तुफानी खेळी साकारली. हे त्याच्या आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीतील चौथे शतक ठरले. या एकाच शतकी खेळीच्या बळावर अभिषेकने क्रिकेट जगतात तब्बल ६ दमदार विक्रमांची नोंद केली आहे.
बटलर-सॉल्टचा विक्रम इतिहासजमा; १८.१३ च्या रनरेटने रचली भागीदारी –
अभिषेकने वैभव सूर्यवंशीसोबत (१९ चेंडूंत ४५ धावा) पहिल्या विकेटसाठी ११८ धावांची स्फोटक सलामी दिली. या भागीदारीदरम्यान भारताचा धावगती दर तब्बल १८.१३ चा रनरेट राहिला. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये १०० हून अधिक धावांच्या कोणत्याही सलामीच्या भागीदारीतील हा आतापर्यंतचा सर्वोच्च रनरेट ठरला आहे. या जोडीने इंग्लंडच्या जोस बटलर आणि फिल सॉल्ट यांचा १६.०८ च्या रनरेटचा (१२६ धावा, २०२५) जागतिक विक्रम मोडीत काढला.
एका डावात १० हून अधिक षटकार; पूर्ण सदस्य देशांमध्ये पहिलाच फलंदाज –
From New Delhi to Wellington ⏩
Abhishek Sharma never forgets to be in his element 🧘♂️
#TeamIndia | #NZvIND | @OfficialAbhi04 https://t.co/tmyvJ1VzI9
— BCCI (@BCCI) October 27, 2026
अभिषेक शर्माने आंतरराष्ट्रीय टी-२० डावात तिसऱ्यांदा १० किंवा त्यापेक्षा जास्त षटकार ठोकण्याचा अद्वितीय पराक्रम केला आहे. आयसीसीच्या पूर्ण सदस्य (Full Member) देशांमध्ये अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. जागतिक यादीत तो ऑस्ट्रियाच्या करणबीर सिंगनंतर (५ वेळा) दुसऱ्या स्थानी आहे.
विराट कोहलीचा विक्रम मोडत बनला अव्वल भारतीय –
ABHISHEK SHARMA RECORD-BREAKING MACHINE.
113 off 38 balls vs NZ 9 fours and 11 sixes
MOST T20 CENTURIES BY INDIANS
Abhishek Sharma 11
Virat Kohli 10
Rohit, KL Rahul & Sanju 8 eachMOST T20I CENTURIES (INDIA)
Rohit Sharma 5
Abhishek Sharma 4 (joint 2nd)
Suryakumar Yadav 4 (joint 2nd)MORE RECORDS
35 ball century today
15 ball fifty
150 career T20I sixes
100+ T20I powerplay sixes first batter ever
113 highest individual score by an Indian in a successful T20I chase.
11 sixes joint 2nd-most by an Indian in a T20I inningsIndia’s exploxive start
50 in 2.2 overs joint-fastest
100 in 5 overs fastest ever
118/0 in 6 overs highest powerplay by a Full Member teamJust 26 years old. Already ahead of Virat Kohli in overall T20 centuries.
#AbhishekSharma #INDvsNZ— 𝙶𝚊𝚞𝚛𝚊𝚟 𝚃𝚒𝚠𝚊𝚛𝚒 (@GauravBrief) October 27, 2026
एकूण पुरुष टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत अभिषेकने दिग्गज विराट कोहलीचा राष्ट्रीय विक्रम उद्ध्वस्त केला. अभिषेकच्या नावावर आता या प्रकारात एकूण ११ शतके नोंदवली गेली असून, त्याने १० शतके झळकावणाऱ्या विराटला मागे टाकले आहे. जागतिक स्तरावर तो आता तिसऱ्या स्थानावर पोहोचला असून त्याच्यापुढे केवळ बाबर आझम (१३) आणि ख्रिस गेल (२२) हे दोनच दिग्गज आहेत. तर आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ४ शतके ठोकत त्याने सूर्यकुमार यादव आणि फिल सॉल्ट यांची बरोबरी केली असून रोहित शर्मा व ग्लेन मॅक्सवेल (५ शतके) यांच्या अगदी जवळ पोहोचला आहे.
१५० आंतरराष्ट्रीय षटकारांचा टप्पा पार –
Vaibhav Sooryavanshi and Abhishek Sharma set 4 world records against New Zealand
-Most runs in a T20I powerplay: 118/0
-Fastest team 50: 2.2 overs
-Fastest team 100: 5 overs
-Most runs in the first over of a powerplay: 26#INDvNZ #AbhishekSharma #VaibhavSooryavanshi #TeamIndia https://t.co/qHaAfSYmpm
— Manoj K. Sharma ✍️ (@EmediaManoj) October 27, 2026
या खेळीदरम्यान अभिषेकने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये १५० षटकारांचा टप्पाही लीलया पार केला. सध्या त्याच्या नावावर ७० सामन्यांत १५८ षटकार जमा झाले आहेत. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये १५० किंवा त्याहून अधिक षटकार खेचणारा तो रोहित शर्मा (२०५ षटकार) आणि सूर्यकुमार यादव (१७९ षटकार) यांच्यानंतरचा केवळ तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.





