Shreyas Iyer Captain : मोठी बातमी! अचानक बदलला कर्णधार; श्रेयस अय्यरला मिळाली मोठी जबाबदारी, ‘हा’ खेळाडू बाहेर

Shreyas Iyer Appointed Mumbai Team Captain : भारतीय क्रिकेट वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय (ODI) मालिकेसाठी भारतीय संघाचा उपकर्णधार म्हणून निवड झालेल्या श्रेयस अय्यरला मोठी जबाबदारी मिळाली आहे. श्रेयसला आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. तो विजय हजारे ट्रॉफीमध्ये उर्वरित साखळी सामन्यांसाठी मुंबईची धुरा सांभाळेल.
श्रेयस अय्यरला अचानक का मिळाली जबाबदारी?
विजय हजारे ट्रॉफीमध्ये आतापर्यंत मुंबई संघाचे नेतृत्व अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर करत होता. मात्र, दुखापतीमुळे शार्दुलला या प्रतिष्ठित ५० षटकांच्या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. त्याच्या अनुपस्थितीत मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यरवर विश्वास दाखवला आहे.
New leader in charge 🏏
Shreyas Iyer steps up as Mumbai captain after Shardul Thakur is ruled out due to injury. #VijayHazareTrophy #ShreyasIyer pic.twitter.com/kfcifR6I8v
— Doordarshan Sports (@ddsportschannel) January 5, 2026
मुंबई क्रिकेट असोसिएशनने ५ जानेवारी रोजी अधिकृत निवेदन जारी करून ही माहिती दिली. “विजय हजारे ट्रॉफीच्या उर्वरित साखळी सामन्यांसाठी श्रेयस अय्यर मुंबई संघाचे नेतृत्व करेल,” असे MCA ने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा – Joe Root Century : जो रुटचा सिडनीत शतकी धमाका! पॉन्टिंगचा मोडला विक्रम; आता सचिनचाही ‘हा’ रेकॉर्ड धोक्यात?
बीसीसीआयच्या ‘ग्रीन सिग्नल’कडे लक्ष –
श्रेयस अय्यरला ११ जानेवारीपासून बडोदा येथे सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात निवडण्यात आले आहे. मात्र, त्याचे खेळणे त्याच्या फिटनेसवर अवलंबून आहे. बीसीसीआयने (BCCI) यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, ‘सेंटर ऑफ एक्सीलेंस’मध्ये अय्यरच्या फिटनेसची चाचणी होईल आणि फिट आढळल्यास तो आंतरराष्ट्रीय संघात सामील होईल.
जर अय्यरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी हिरवा कंदील मिळाला, तर विजय हजारे ट्रॉफीच्या बाद फेरीसाठी (नॉकआउट) मुंबईला नवीन कर्णधार शोधावा लागेल. १२ जानेवारीपासून या स्पर्धेचे बाद फेरीचे सामने सुरू होणार आहेत.
हेही वाचा – Bangladesh Refuse : बांगलादेश विश्वचषकातून बाहेर पडणार का? आयसीसीकडे कोणते आहेत तीन पर्याय? जाणून घ्या
एमसीए सचिव काय म्हणाले?
एमसीए सचिव उन्मेश खानविलकर यांनी सांगितले की, “सध्या श्रेयस उर्वरित दोन साखळी सामन्यांमध्ये मुंबईचे नेतृत्व करेल. त्यानंतरच्या परिस्थितीनुसार आम्ही पुढील निर्णय घेऊ.”





