Mumbai Cricket Association, Ranji Trophy 2024 Prize Money for Mumbai Team : रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मुंबईने विदर्भाचा 169 धावांनी पराभव केला. मुंबईने तब्बल 8 वर्षांनंतर रणजी करंडक जिंकला आहे. याआधी मुंबईने 2015-2016 मध्ये सौराष्ट्राचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते.
रणजी ट्रॉफी 2023-24 च्या अंतिम सामन्यात विदर्भाचा पराभव करून ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई संघासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) गुरुवारी मोठी घोषणा केली. 42व्यांदा रणजी जिंकणाऱ्या मुंबई संघासाठी त्यांनी 5 कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम जाहीर केली आहे.
एमसीएचे सचिव अजिंक्य नाईक यांनी सांगितले की, एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे आणि ॲपेक्स कौन्सिलने रणजी ट्रॉफीच्या बक्षिसाची रक्कम दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. एमसीए मुंबई रणजी करंडक विजेत्या संघाला अतिरिक्त 5 कोटी रुपये देणार आहे. एमसीएसाठी हे वर्ष खूप चांगले आहे कारण असोसिएशनने सात विजेतेपदे जिंकली आहेत आणि आम्ही बीसीसीआय स्पर्धांमध्ये सर्व वयोगटांमध्ये बाद फेरी गाठली आहे.
मुंबईने गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर विदर्भाचा 169 धावांनी पराभव करून विक्रमी 42वे रणजी विजेतेपद पटकावले. रणजी ट्रॉफीच्या विजेतेपदाच्या सामन्यात विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या डावात 224 धावा केल्या.
Ranji Trophy 2024 : चॅम्पियन मुंबईवर पैशांचा पाऊस…! जाणून घ्या, किती मिळाली बक्षिसाची रक्कम…
प्रत्युत्तरात विदर्भाचा पहिला डाव 105 धावांत आटोपला. त्यानंतर दुसऱ्या डावात मुंबईने 418 धावा केल्या आणि त्यांची एकूण आघाडी 537 धावांची झाली आणि विदर्भासमोर 538 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात विदर्भाचा संघ दुसऱ्या डावात 368 धावांत सर्वबाद झाला. यासह मुंबईने हा सामना 169 धावांनी जिंकला.