Shreyas Iyer Angry : श्रेयस अय्यर सुरक्षारक्षकावर भडकला; म्हणाला, “भाई, तुझं काम गर्दी हटवणं आहे…”, पाहा VIDEO

नेमकं काय घडलं?
नुकतीच पंजाब किंग्सचा खेळाडू शशांक सिंग याची वाढदिवसाची पार्टी पार पडली. या पार्टीला अभिनेत्री आणि पंजाब टीमची सह-मालकीण प्रीती झिंटासह श्रेयस अय्यरही उपस्थित होता. अय्यर हॉटेलवर पोहोचताच चाहत्यांनी त्याला सेल्फी आणि ऑटोग्राफसाठी गराडा घातला. यावेळी गर्दी नियंत्रित करण्याची जबाबदारी असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांपैकी एकाने गर्दी हटवण्याऐवजी स्वतःच अय्यरसोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला.
View this post on Instagram
आधीच दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या आणि गर्दीत अडकलेल्या अय्यरचा संयम सुटला. त्याने त्या कर्मचाऱ्याला फटकारत स्पष्ट शब्दांत सुनावले, “भाई, तुझं काम गर्दी हटवणं आहे.” हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, चाहत्यांनी अय्यरच्या या भूमिकेचे समर्थन केले आहे. खेळाडूची सुरक्षा आणि दुखापतीची स्थिती पाहता अय्यरचा संताप योग्य असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.
दुखापत किती गंभीर?
🚨 SHREYAS IYER SPOTTED! 🚨
Back in the buzz! ✨
Shreyas Iyer was spotted in Mumbai after his injury rehab, alongside Punjab Kings co-owner Preity Zinta.#TeamIndia #ShreyasIyer pic.twitter.com/ebZySnawr6
— Rana Ahmed (@RanaAhmad056) November 23, 2025
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात झेल पकडताना अय्यरला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला सिडनीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय चाचण्यांमध्ये त्याच्या ‘स्प्लीन’ला दुखापत झाल्याचे समोर आले आहे. ही दुखापत अत्यंत संवेदनशील असल्याने डॉक्टरांनी त्याला भारतात परतल्यावर किमान दोन महिने सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
हेही वाचा – IND vs SA : ‘तू घरी खेळतोय का?’ कुलदीपवर संतापला कर्णधार ऋषभ, नेमकं काय होतं कारण? पाहा VIDEO
श्रेयस आयपीएल २०२५ ला मुकणार?
येत्या काळात अय्यरची पुन्हा वैद्यकीय चाचणी केली जाईल. जर दुखापत पूर्णपणे बरी झाली नसेल, तर त्याला आणखी विश्रांती घ्यावी लागेल. यामुळे तो केवळ दक्षिण आफ्रिका मालिकाच नव्हे, तर आयपीएल २०२५ चे सुरुवातीचे काही सामन्यांनाही मुकण्याची दाट शक्यता आहे.





